नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथील लैंगिक अत्याचार, जमीन हडपणे, रेशन घोटाळा तसेच ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला असे विविध आरोप असलेल्या शाहजहान शेख याला तृणमूल काँग्रेस पक्षाने 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ही माहिती दिली आहे. तत्पूर्वी, आज, गुरुवारी पहाटे अटक करण्यात आलेल्या शहाजहान शेख याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – Maharashtra Budget Session : “आपल्याला काय…”, अर्थसंकल्पावर बोलताना जयंत पाटलांनी सरकारला सुनावले
संदेशखळीमधील तृणमूल काँग्रेसचा नेते आणि कार्यकर्त्यांनी महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अलीकडेच समोर आली होती. तृणमूल काँग्रेसचे लोक घरात घुसतात. एखादी स्त्री सुंदर दिसली तर ते तिला सोबत घेऊन जातात. तिच्यावर अनेक दिवस बलात्कार होतो आणि नंतर तिला सोडून देतात, असा आरोप अनेक महिलांनी केला आहे. तृणमूलच्या नेत्याकडून होत असलेल्या या अत्याचाराविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता आणि जिल्हा परिषद सदस्य शेख शाहजहान हा मुख्य आरोपी असून त्याच्या अटकेची मागणी महिलांनी केली होती.
#WATCH | TMC leader Derek O’Brien in Kolkata announces, “TMC has decided to suspend Sheikh Shahjahan from the party for six years.” pic.twitter.com/AYq3wtktBR
— ANI (@ANI) February 29, 2024
यावरून राजकीय वातवारण तापल्यानंतर पोलिसांनी सुमारे 55 दिवसांपासून फरार असलेल्या शाहजहान शेख याला पोलिसांनी आज, गुरुवारी बेड्या ठोकल्या. केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) किंवा पश्चिम बंगाल पोलीस शेखला अटक करू शकतात, असे कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले होते. त्यानंतर 24 तासांत शेखला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा – Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा भाजपाचीच, राणेंची शिंदे गटाला चपराक
तथापि, कथित रेशन घोटाळा प्रकरणात 5 जानेवारी रोजी त्याच्या घरावर छापा टाकताना ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी नजत पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये शाहजहान शेखला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय दंड संहितेच्या कलम 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्राद्वारे दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 307 (हत्येचा प्रयत्न), 333 (लोकसेवकाला गंभीर दुखापत करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Maharashtra Budget Session : कुसुमाग्रजांच्या कवितेवरून विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना चिमटा