घरमहाराष्ट्रपुणेNilesh Rane : थकबाकी 25 लाखांची, बजावले 3 कोटी; पालिका म्हणते चुकून...

Nilesh Rane : थकबाकी 25 लाखांची, बजावले 3 कोटी; पालिका म्हणते चुकून झाले

Subscribe

पुणे : राज्यातील राजकारणात चर्चेत राहणाऱ्या राजकीय परिवारापैकी एक असलेल्या राणे कुटुंबातील माजी खासदार निलेश राणे यांना बुधवारी (28 फेब्रुवारी) पुणे महानगरपालिकेने दणका दिला होता. निलेश राणे यांनी कर चुकविल्याप्रकरणी पुण्यातील त्यांच्या मालमत्तेवर महापालिकेने कारवाई केली होती. मात्र आता ही रक्कम चुकून आकारल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय 25 लाख रुपयांचा चेक दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने निलेश राणेंच्या या मालमत्तेवरील कारवाई थांबवली आहे. (Nilesh Rane Outstanding 25 Lakhs Paid 3 Crores The municipality says it was a mistake)

हेही वाचा – Politics : ‘मी जन्मजात भाजपाचाच’ म्हणत सोलापूरचा ‘हा’ नेता अजितदादांना देणार धक्का

- Advertisement -

पुण्यामधील डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने माजी खासदार निलेश राणे यांची मालमत्ता बुधवारी पालिकेकडून सील करण्यात आली होती. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने मालमत्ता थकबाकी प्रकरणी ही कारवाई केली. निलेश राणे यांनी 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी केल्याचे समोर आले होते. मात्र एवढी रक्कम महापालिकेकडून चुकून आकारण्यात आल्याचा दावा राणे कुटुंबाकडून करण्यात आला होता.

राणे कुटुंबाच्या दाव्यानंतर पुणे महापालिकेकडून मान्य करण्यात आला असून तसेच 25 लाखांचा चेक मिळाल्यानंतर निलेश राणे यांच्या मालमत्तेवर लावलेले सील उघडायच ठरवलं आहे. विशेष म्हणजे निलेश राणे यांची थकबाकी शून्य करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय दबावापोटी त्यांची थकबाकी शून्य करण्यात आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याशिवाय सर्वसामान्यांनी मालमत्ताकर थकल्यावर त्यांच्या घरासमोर बॅंड वाजवणारे महापालिकेचे प्रशासन निलेश राणेंचा तब्बल 3 कोटी 52 लाख रुपयांचा मालमत्ताकर माफ करण्यास तयार कसे झाले, असा प्रश्नही सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sushmai Andhare : जरांगेंची एसआयटी म्हणजे फडणवीसांचे ‘कहीं पे निगाहें…’, अंधारेंची गुगली

तीन वर्षांपासून होती थकबाकी

दरम्यान, निलेश राणे यांचे पुण्यातील डेक्कन परिसरात आर-डेक्कन मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर हॉटेल आहे. या हॉटेलची 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची मागील तीन वर्षांपासून थकबाकी होती. महापालिकेच्या माध्यमातून थकबाकी प्रकरणी वारंवार पाठपुरावा केला जात होता. काही दिवसापूर्वीच नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र तरीही थकबाकी न भरल्याने राणेंची मालमत्तेवर कारवाई करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -