घरदेश-विदेश...आता त्या सुद्धा चालवणार कार!

…आता त्या सुद्धा चालवणार कार!

Subscribe

सौदी अरेबियातील महिलांनी गेल्या २८ वर्षापासून केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. सौदी अरेबियातील महिला आता कार चालवणार आहे. महिलांवर कार चालवण्यावर घातलेली बंदी हटवण्यात आलेली आहे. सौदी सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालवण्यावर लावलेली बंदी अखेर हटवण्यात आली आहे. सौदी अरेबिया सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता सौदीमधील महिला रस्त्यांवर गाडी चालवताना पहायला मिळणार आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानंतर सौदी सरकारने ही घोषणा केली होती. याच महिन्यामध्ये महिलांना लायसन्सची वाटप करण्यात आली. आज लायसन्स देण्याच्या प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. सौदी अरब हा जगातील शेवटा देश होता ज्या देशामध्ये आतापर्यंत महिलांना गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

- Advertisement -

२८ वर्षाच्या संघर्षाला अखेर यश

गाडी चालवण्याच्या अधिकारासाठी सौदी अरेबियातील महिला कार्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. हा अधिकार मिळावा यासाठी गेल्या काही वर्षापासून महिलांकडून मागणी होत होती. सौदी सरकारने महिलांच्या या आंदोलनाला दाबण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. महिला अधिकारासाठी काम करणाऱ्या ८ कार्यकर्त्यांनी याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता सौदी सरकारने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महिलांच्या २८ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे.

गाडी चालवल्याने महिलांना अटक

सौदी अरेबियातील रियादमध्ये १९९० मध्ये काही महिलांना गाडी चालवल्यामुळे अटक केली होती. २००८ आणि २०११ ते २०१४ च्या दरम्यान सौदीतील काही महिलांनी सौदी शासनाच्या नियमांच्याविरोधात जाऊन गुपचुप कार चालवली होती. त्याचा व्हिडिओ काढून या महिलांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

- Advertisement -

व्हिजन २०३० चा परिणाम

प्रिन्स सलमान यांनी आपल्या व्हिजन २०३० मध्ये सौदीतील महिलांना आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय सुरु करण्याचे अधिकार दिले आहेत. त्याचप्रमाणे महिलांना स्टेडिअमवर जाण्यासाठी लावण्यात आलेली बंदी देखील सरकारने हटवली. प्रिंस सलमान सौदीतील अनेक लोकांना अर्थव्यवस्थेचा भाग बनवू इच्छित असल्याचे व्हिजन २०३०मध्ये म्हटले आहे. यामुळे देशाच्या उत्पादकतेतही वाढ होईल. देशातील अनेक कट्टरपंथी संघटनांनी प्रिन्स सलमानच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -