घरदेश-विदेशमाजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचा जीवनप्रवास

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचा जीवनप्रवास

Subscribe

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी आज निधन झाेले. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांनी १२.०७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

अरूण जेटली यांचा थोडक्यात जीवनप्रवास

  • अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला असून जेटलींनी नवी दिल्लीच्या सेंट झेवियर्स शाळेमधून प्राथमिक शिक्षण घेतलं होते.
  • त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीच्याच श्रीराम कॉलेजमधून कॉमर्स शाखेतून पदवी घेतली होती.
  • नवी दिल्ली विद्यापीठातून अरुण जेटली यांनी कायद्याची पदवी देखील घेतली होती.
  • विद्यापीठात शिकत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी राजकीय प्रवासा सुरु केला होता. ते विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडूनही आले होते.
  • १९९१ पासून ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य होते.
  • १९९९मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता.
  • वाजपेयींच्या सरकारमध्ये जेटलींकडे निर्गूंतणूक खात्याचं राज्यमंत्रीपदही देण्यात आलं होते.
  • अरुण जेटलींकडे २००० साली विधी, न्याय मंत्रालयाचा कार्यभार होता.
  • २००९ मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती.
  • उत्तर प्रदेशातून २०१४ साली जेटली राज्यसभेवर निवडून आले होते.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कारभार २०१४-१६ मध्ये जेटलींनी पाहिला होता. तसेच २०१४-१७ मध्ये त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळला होता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -