घरदेश-विदेशशरद पवार थेटच बोलले; मोदींचे आरोप वास्तवाला धरून नाही, निवडणुकीचा धसका घेतल्यामुळे...

शरद पवार थेटच बोलले; मोदींचे आरोप वास्तवाला धरून नाही, निवडणुकीचा धसका घेतल्यामुळे ‘असे’ बोलत असतील

Subscribe

मुंबई : मी देशाचा कृषीमंत्री असताना देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला दिली आहे. शिर्डीमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना काही केले नाही, असा आरोप केला. या आरोपावर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन 2004 ते 2014 कार्यकाळात कृषीमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचे वाचन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डी दौऱ्यादरम्यान शरद पवारांवर टीका केली. यावर शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान शिर्दीतील कार्यक्रमात काही मुद्दे मांडल आणि जी माहिती दिली ती वस्थुस्तीपासून दूर असून पंतप्रधान हे पद संस्थात्मक आहे. मला पंतप्रधानाची प्रतिमा राखायला हवी, असे वाते. मी पंतप्रधानाच्या पदाची प्रतिमा राखून बोलणार आहे. 2004 ते 2014 या काळावधीत देशाच्या कृषमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती. देशात 2004मध्ये अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर पहिला दिवशी नालाईजाने एक कटू निर्णय घ्यावा लागला. देशात अमेरिकेहून गहू आयात करावा लागला. देशातील अन्नधान्याच्या साठाची स्थिती चांगली नव्हती. माझ्याकडे गहू अमेरिकेतून मागवण्याची फाईल आली होती. पण मी त्यावर सही केली नाही.  मी विचार करत होतो आणि मी अस्वस्थ होतो की, मी देशाचा कृषी मंत्री असताना परदेशातून धान्य आणणाचे ते मला पटत नव्हते. ती फाईल माझ्याकडे पडून होती. दोन दिवसांनंतर मनोहन सिंग यांनी माझ्याशी संपर्क केला. त्यांनी मला विचारले की, सध्या देशात स्टॉकची अवस्था काय आहे. हे तुम्ही पाहिले का?मी त्यांना म्हटले की, थोडी माहिती आहे पण सखोल माहिती नाही. तुम्ही फाईलवर सही नाही केली तर आपल्या देशात धान्यचा तुटवडा निर्माण होईल, असे त्यांनी मला सांगितले. यानंतर मी फाईलवर सही केली.”

- Advertisement -

हेही वाचा – साईंच्या दर्शनाला गेले होते की शरद… काय गरज होती? पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

पिकाच्या हमीभावाला दुप्पीटपेक्षा जास्त वाढ

शरद पवार पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी पीक उत्पादनसाठी तातडीने काही पावले उचली पाहिजेत. या दृष्टीने आमच्या सरकारने काही निर्णय घेतले. अन्नधान्य आणि डाळी यांचाय जो हामी भाव असतो. त्यात वाढ कशी करता येईल, 2004 ते 2014 या काळात तांदूळ, गहू, कापूस, ऊस आणि सोयाबीन या सगळ्या पिकाच्या हमीभावाला दुप्पीटपेक्षा जास्त वाढ झाली.”

- Advertisement -

‘या’ योजनांमुळे देशांच्या कृषी क्षत्राचा चेहराबद्दला

यूपीए सत्तेत असताना शेती आणि सलगन क्षेत्रात बदल करण्याच्या दृष्टीने काही योजना सुरू केल्या. त्यात एक एन.एच.एम. 2005 रोजी यातून भाजीपाला उत्पादन वाढवले. राष्ट्रीय कृषी विकास योजना (2007) या योजनाच्या आढावा घेतल्यानंतर कळेल की, या योजनांमुळे देशाच्या कृषी क्षेत्रांचा चेहराबद्दला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -