घरताज्या घडामोडीHimachal Weather : हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा कहर, लेह-मनाली महामार्ग बंद

Himachal Weather : हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा कहर, लेह-मनाली महामार्ग बंद

Subscribe

मागील तीन दिवसांपासून हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. या हिमवृष्टीमुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली आहे. अशातच हिमवृष्टीमुळे राज्यातील 196 रस्ते बंद आहेत. याशिवाय 150 ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मागील तीन दिवसांपासून हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे. या हिमवृष्टीमुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली आहे. अशातच हिमवृष्टीमुळे राज्यातील 196 रस्ते बंद आहेत. याशिवाय 150 ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच, सर्व महामार्गही बंद वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. (shimla weather sunny days after heavy snowfall lahaul and atal tunnel cut off heavy snow manali)

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये, लेह मनाली महामार्ग (NH-003), दारचा-शिंकुला रोड, पांगी-किल्लार महामार्ग (SH-26), काझा-ग्राफु रोड आणि सुमदो ते लोसार (NH-505) हे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहेत. मनालीतील सोलांग नाल्याच्या पलीकडे लेह मनाली महामार्गावर वाहतूक बंद आहे. अटल बोगद्याजवळ खूप बर्फ पडला आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील उंच भागात हिमवृष्टीनंतर तापमानात घट झाल्याने 10 पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही परिणाम झाला आहे. कडाक्याच्या थंडीनंतर पाण्याचे पाईप गोठल्याने लोकांच्या घरात पिण्याचे पाणी येत नाही. चंबामध्ये 4 आणि लाहौल स्पितीमध्ये 6 योजना रखडल्या आहेत. लाहौल स्पितीमध्ये बर्फवृष्टीमुळे लोकांना नद्या आणि नाल्यांतून पाणी आणावे लागत आहे.

याशिवाय, हिमवृष्टीमुळे कुल्लू, लाहौल स्पीती आणि किन्नौरच्या उंच भागात लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. हिमवृष्टीमुळे राज्यातील 196 रस्ते बंद आहेत. तसेच, 150 ट्रान्सफॉर्मर (डीटीआर) तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. लाहौल स्पीतीमधील सर्वाधिक 148 रस्ते, चंबामधील 7 रस्ते, किन्नौरमधील 25 रस्ते, कुल्लूमधील 12 रस्ते, मंडी आणि शिमलामध्ये प्रत्येकी एक रस्ता बर्फवृष्टीमुळे बंद आहे. हिमवृष्टीमुळे हिमाचलला या हंगामात 7.06 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिमला, मंडी, चंबा जिल्ह्यात प्रत्येकी एक कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील अनेक भागात तीन दिवसांच्या हिमवृष्टी आणि पावसानंतर आता हवामान स्वच्छ झाले आहे. लाहौल स्पितीमध्ये तीन दिवसांच्या बर्फवृष्टीनंतर आता रविवारी सूर्य बाहेर आला आहे. मात्र, लाहौल खोरे देश आणि जगापासून तुटले असून येथील रस्ते बर्फाने झाकलेले आहेत.

सध्या रस्ते पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिमल्यासह राज्यातील इतर भागातही सूर्यप्रकाश होता. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार हिमाचल प्रदेशात रविवारपासून पुढील 4 दिवस हवामान स्वच्छ राहील. मात्र 16 फेब्रुवारीपासून हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – WHO कडून मिळाला पुन्हा एकदा धोक्याचा इशारा; ‘या’ आजारापासून राहण्यास सांगितले सावध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -