घरदेश-विदेशसिंगापूर: सुपर मार्केटने मुस्लीम जोडप्याला दिली नाही इफ्तारी; म्हणाले हे भारतीयांसाठी नाही

सिंगापूर: सुपर मार्केटने मुस्लीम जोडप्याला दिली नाही इफ्तारी; म्हणाले हे भारतीयांसाठी नाही

Subscribe

शनल ट्रेड्स युनियन काँग्रेस (NTUC) द्वारे चालवल्या जाणार्‍या सुपरमार्केटमधील एका पुरुष कर्मचाऱ्याने या जोडप्याला स्नॅक स्टँडमधून हाकलून लावले होते.

सिंगापूरच्या एका प्रमुख सुपरमार्केटने रमजानच्या पवित्र महिन्यात एका भारतीय मुस्लिम जोडप्याला इफ्तारी साठी दिला जाणारा स्नॅक्स घेऊ दिला नाही, आता या वर्तनाबाबत सुपर मार्केटने माफी मागितली आहे. 9 एप्रिलला इफ्तारीसाठी मोफत मिळणारा फराळ खाण्यापासून भारतीय मुस्लिम कुटुंबाला बंदी घालण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल ट्रेड्स युनियन काँग्रेस (NTUC) द्वारे चालवल्या जाणार्‍या सुपरमार्केटमधील एका पुरुष कर्मचाऱ्याने या जोडप्याला स्नॅक स्टँडमधून हाकलून लावले होते. Singapore ramzan eid 2023 Supermarket doesn’t serve Muslim couple Iftar Said this is not for Indians

९ एप्रिलला नेमकं काय घडलं?

9 एप्रिल रोजी सिंगापूरस्थित फराह नाद्या आणि तिचा पती जहांबर शालिह टॅम्पाइन्स हबमधील फेअरप्राईस आउटलेटमध्ये गेले. खरेदी करत असताना, ते इफ्तार बाईट स्टेशनच्या दिशेने गेले तेव्हा तेथील एका कर्मचाऱ्याने त्याला थांबवले आणि सांगितले की ही मोफत ट्रीट भारतीयांसाठी नाही. जहांबार हा भारतीय आहे, तर त्याची पत्नी फराह भारतीय-मलेशियन आहे.

- Advertisement -

फराह नाद्याने सांगितले की, हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं. खरेदी केल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेचा अनुभव शेअर केला. त्यात तिने लिहिले आहे की, मोफत ट्रीट घेण्याचा तिचा हेतू नव्हता, ती फक्त अशा कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी थांबली होती.

( हेही वाचा: येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा मिळवू – जयंत पाटील )

- Advertisement -

सुपरमार्केटकडून दिलगिरी व्यक्त

आता हे प्रकरण समोर आल्यानंतर फेअरप्राइस आउटलेटने माफी मागितली आहे. फेअर प्राइसच्या प्रवक्त्याने सांगितले ही एक गंभीर बाब आहे आणि आम्ही या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आहे.

अहवालानुसार, फेअरप्राइस ग्रुपने 23 मार्चपासून आपले इफ्तार बाईट स्टेशन सुरू केले आणि रमजान महिन्यात एक उपक्रम सुरू केला. ते महिनाभर चालणाऱ्या रमजान कालावधीत मुस्लिम ग्राहकांना त्यांच्या ६० आऊटलेट्सवर खजूरांसह मोफत स्नॅक्स किंवा त्यांच्या आवडीचे पेय देतात. या उपक्रमांतर्गत, मुस्लिम ग्राहकांना इफ्तारच्या 30 मिनिटे आधी आणि नंतर पेय दिले जातात आणि रमझानमध्ये संध्याकाळच्या नमाजानंतर घेतले जेवण दिले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -