घरटेक-वेककविता लिहीणारा अनोखा रोबोट

कविता लिहीणारा अनोखा रोबोट

Subscribe

या खास रोबोटला अतापर्यंत तब्बल २ हजार ७०० कविता शिकवून प्रशिक्षीत करण्यात आलं आहे.

‘रोबोट’ला अनेकदा माणसांचा मित्र म्हटलं गेलं आहे. आजवर जगभरातील अनेक कंपन्यांनी विवध प्रकारची कामं करणारे रोबोट्स बनवले आहेत. भविष्यात माणसांची जागा घेऊ शकतील अशा अत्याधुनिक रोबोट्सची निर्मिती आतापर्यंत करण्यात आली आहे. याच धर्तीवर सध्या काही संशोधक खास कविता करणारा रोबोट तयार करत आहेत. आर्टिफिशिअल इंटलिजन्सच्या साहाय्याने संशोधकांना अशा अल्गोरिदम्सची निर्मिती केली आहे ज्याचे मदतीने रोबोटही कविता लिहू किंवा रचू शकणार आहेत. दरम्यान शेक्सपिअरप्रमाणे कविता करणारा एक आधुनिक रोबोट बनवण्याचं आमचं, स्वप्नं असल्याचं निर्माणकर्त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :  रोबोट चालणार ‘पॉपकॉर्न’च्या उर्जेवर !

कॅनडामधील टोरंटो युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न युनिव्हर्सिटी इथल्या तज्ज्ञांनी हे खास अल्गोरिदम बनवले आहेत. या अल्गोरिदमच्या साहाय्यने खऱ्याखुऱ्या कवितेतील मात्रा तसंच लय यांच्यानुसार रोबोटही काव्य रचू शकतो. दरम्यान या कविता लिहिणाऱ्या या रोबोटचं प्राथमिक मॉडेल तयार असून त्या रोबोटला अतापर्यंत तब्बल २ हजार ७०० कविता शिकवून प्रशिक्षीत करण्यात आलं आहे. रोबोटमध्ये देण्यात आलेल्या अल्गोरिदममध्ये विविध भाषा, लय आणि मात्रा या गोष्टी इनबिल्ट आहेत. दरम्यान या रोबोटवर अजून ५० टक्के काम करणं बाकी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. तसंच कविता रचतेवेळी रोबोटकडून अचूक आणि आवश्यक शब्दांची निवड व्हावी यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचं, संशोधकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा : भांडी घासणारा ‘स्क्रबिंग रोबोट’ !
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -