घरदेश-विदेशतुम्ही काय केले हे आम्हाला माहित आहे - काँग्रेस

तुम्ही काय केले हे आम्हाला माहित आहे – काँग्रेस

Subscribe

शीख दंगल प्रकरणात काँग्रेसचे सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे भाजपला बळ मिळाले आहे. या दंगल प्रकरणात मध्यप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप आता भाजपने केला आहे. भाजपच्या या आरोपवर काँग्रेसने प्रत्युत्तर देत भाजपवर देखील टीका केली आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. जो निर्णय आला आहे तो कायदेशीरच असून त्याचे राजकारण करू नये असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण आणि जस्टिस. लोया प्रकरण कशाप्रकरे दाबण्यात आले हे आम्ही बघितले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करू नये

१९८४च्या शीख दंगली प्रकरणी दिल्ली हाय कोर्टाने काँग्रेसचे सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजप आणि अकाली दलाने काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या दंगलीत कमलनाथ यांचाही मोठा सहभाग होता, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाला काँग्रेसनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. कायद्याने आपलं काम केलं आहे. यातून कोणताही राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते आभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे

- Advertisement -

गुजरात दंगलीत भाजप नेत्यांची नावं

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी देखील भाजपवर जोरदार टीका केली आहे. कोर्टाने जो निर्णय दिला आहेहे, तो कायदेशीर आहे. सोहराबुद्दीन बनावट चकमक कशी दाबली. तसंच जस्टिस. लोयांच्या मृत्यूचं काय झालं?? ते आम्ही बघितलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाला राजकीय रंग देऊ नये. २००२ मधील गुजरात दंगलीमध्ये अनेक भाजप नेत्यांची नाव असल्याचे सांगत कपिल सिब्बल यांनी देखील भाजपला धारेवर धरले आहे.

उशिरा का होईना न्याय मिळाला

दरम्यान काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील कुमार झाखर यांनी देखील भाजपला उत्तर दिले आहे. जे दंगलीग्रस्तांना न्याय मिळायला हवा ही काँग्रेसची भूमिका आहे. न्याय मिळायला उशीर झाला पण मिळाला आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठं नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

Breaking : शीख दंगलप्रकरणी सज्जन कुमारला जन्मठेप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -