घरमुंबईमुंबईत १० वर्षात घडल्या ४८ हजार ४३४ आगीच्या घटना

मुंबईत १० वर्षात घडल्या ४८ हजार ४३४ आगीच्या घटना

Subscribe

मुंबईत गेल्या १० वर्षात ४८ हजार ४३४ आगीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या आगींची कारणे आणि त्यांची आकडेवाडी समोर आली आहे.

मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु मुंबई हे अपघाताचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत तब्बल ४८ हजार ४३४ आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस मुंबई अग्निशमन दलांनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे २००८ पासून २०१८ पर्यंत मुंबईत किती आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच किती गगनचुंबी इमारती, व्यावसायिक इमारतीत आणि झोपड्या आहेत. तसेच कोणत्या कारणामुळे आग लागली आहे आणि आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे? तसेच किती रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी. सावंत यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन २००८ पासून जुलै २०१८ पर्यंत एकूण ४८ हजार ४३४ आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यात १ हजार ५६८ गगनचुंबी इमारतीत आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच ८ हजार ७३७ रहिवाशी इमारतीत आगीच्या घटना घडल्या आहेत. तर ३ हजार ८३३ व्यासायिक इमारतीत आगीच्या घटना घडल्या असून ३ हजार १५१ झोपडपाट्यामध्ये आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

ही आहेत आगीची कारणे

सर्वात जास्त म्हणजे तब्बल ३२ हजार ५१६ ठिकाणी लागलेल्या आगीचे कारण शोर्टसर्किट हे आहे. तर तब्बल १ हजार ११६ आग गैस सिलिंडर लिकेजमुळे लागली आहे आणि तब्बल ११ हजार ८८९ आगीच्या घटना अन्य कारणामुळे लागल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेमध्ये एकूण ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात २१२ पुरुष, २१२ स्त्रिया आणि २९ मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत ८९ कोटी ४ लाख ८६ हजार १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

ही आहे आगीच्या घटनांची आकडेवारी

तसेच परिमंडळ-I चे हद्दीत एकूण ९ हजार ८८७ ठिकाणी आग लागली असून त्यात ३२५ गगनचुंबी इमारती आहेत. तर १ हजार ५४६ रहिवाशी इमारती आहेत. त्याचप्रमाणे ९८७ व्यावसायिक इमारत आणि ७५ झोपड्यात आग लागल्याचा घटनेत समावेश आहे. तसेच परिमंडळ-II चे हद्दीत सर्वात जास्त एकूण १० हजार ७१९ आगीच्या घटना असून त्यात १२९ गगनचुंबी इमारत, १ हजार ८२४ रहिवाशी इमारत, ६६४ व्यावसायिक इमारत आणि ९३४ झोपड्यात आगीच्या घटनेचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-III चे हद्दीत एकूण ८ हजार ७१७ आगीच्या घटना असून त्यात ४९६ गगनचुंबी इमारत, १ हजार ३८२ रहिवाशी इमारत, ९३९ व्यावसायिक इमारत आणि ४४३ झोपड्यांचा या घटनेत समावेश आहे. तसेच परिमंडळ-IV चे हद्दीत एकूण ८ हजार ३२८ आगी लागली असून त्यात २८९ गगनचुंबी इमारत, १ हजार ८३५ रहिवाशी इमारत, ६६१ व्यावसायिक इमारत आणि ४०३ झोपड्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच परिमंडळ-V चे हद्दीत एकूण ५ हजार ६८३ आगीच्या घटना असून त्यात ५० गगनचुंबी इमारत, १ हजार ५४७ रहिवाशी इमारत, २०८ व्यावसायिक इमारत आणि १ हजार २७३ झोपड्यांचा या घटनेत समावेश आहे. तसेच परिमंडळ-VI चे हद्दीत एकूण ५ हजार १०७ आग लागली असून त्यात २७९ गगनचुंबी इमारत, ६०३ रहिवाशी इमारत, ३७३ व्यावसायिक इमारत आणि २३ झोपड्यांचा या घटनेत समावेश आहे.

- Advertisement -

गगनचुंबी इमारतीत ४९६ आगीच्या घटना

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण ४९६ आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत १ हजार ८३५ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-I च्या हद्दीत ९८७ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-V च्या हद्दीत १ हजार २७३ इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त एकूण १७७ लोकांचा बळी परिमंडळ-I च्या हद्दीत झाला आहे. तसेच सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण ३९ कोटी ४८ लाख ९ हजार ६८६ इतक्या रुपयांचे नुकसान झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना अधिनियम -२००६ च्या अमलबजावणी का करत नाही? अजूनही आग दुर्घटनेची वाट पाहत आहे का? यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांस पत्र पाठवून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना अधिनिय-२००६ च्या अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -