घरदेश-विदेशपुलवामामध्ये दहशतवाद्यांनी माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची केली निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची केली निर्घृण हत्या, मुलीची प्रकृती गंभीर

Subscribe

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दहतवाद्यांनी कुरघोड्या करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. यात रविवारी माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची व त्यांच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. यावेळी या पोलिस अधिकाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपण्याचा प्रयत्न दहतवाद्यांकडून करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या हरिपरीग्राम गावातील राहणारे माजी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाऱ्यात माजी अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यासोबतच एसओपींची मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घालत या दहशवाद्यांची शोध मोहिम सुरु केली आहे.

जम्मूच्या सतवारी परिसरातील एअरफोर्स बेसवर झालेल्या शक्तीशाली ड्रोन स्फोटानंतर ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या ड्रोन स्फोटामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटना असल्याची माहिती समोर येत आहे. ड्रोनच्या सहाय्याने झालेला पहिला स्फोट पहाटे १.४० च्या सुमारास झाला. या स्फोटात जवळच्या विमानतळच्या तांत्रिक भागातील इमारतीचे छत कोसळले. या जागेची देखभाल भारतीय वायुसेना करत होती. त्यादरम्यान दुसरा स्फोट अगदी सहा मिनिटांनी घडवण्यात आला. हा दुसरा स्फोट जमिनीवर झाला. मात्र यात वायुसेनेचे दोन जवान जखमी झाले. जम्मू विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय सीमा यादरम्यानचं हवाई अंतर १४ किलोमीटर आहे. त्यामुळे एवढे अंतर पार करत हे ड्रोन याठिकाणी पोहचले कसे याचा तपास सुरु आहे. सध्या तपास यंत्रणा दोन्ही ड्रोनच्या हवाई मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु यातून दहशवादी हल्ल्या घडवण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नाकारली नाही.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -