घरदेश-विदेशश्रीलंकेत हिंसक आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार; 1 ठार, 10 जण जखमी

श्रीलंकेत हिंसक आंदोलकांवर पोलिसांकडून गोळीबार; 1 ठार, 10 जण जखमी

Subscribe

श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात निदर्शने दिली जात आहे. या आदोलकांना नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला

श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात निदर्शने दिली जात आहे. या आदोलकांना नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य श्रीलंकेतील रामबुक्कानामध्ये निदर्शकांनी महामार्ग रोखला होता. हे ठिकाण कोलंबोपासून 95 किमी अंतरावर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक निषेध करत आहेत. हजारो वाहनधारकांनी जाळपोळ करत प्रमुख रस्ते रोखले आहेत. श्रीलंका सध्या अन्न, औषधे आणि इंधनाच्या संकटाशी झुंजत आहे.

- Advertisement -

1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंकेवर आलेले हे सर्वात मोठे आर्थिक संकट आहे. या संकटामुळे लोक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याशिवाय, श्रीलंकेला अन्न आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ज्याचा परिणाम श्रीलंकन जनेतवर होत आहे. तर कोरोना संकटामुळे आधीच देशातील व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

परिणामी, श्रीलंकेला परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे, संयोगाने, जीवनावश्यक वस्तू आणि इंधन आयात करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला, ज्यामुळे देशात दीर्घकाळ वीज कपात झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – युद्धात व्यस्त असलेल्या रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता, चीनने तोंड फिरवल्यामुळे भारताला मदतीची हाक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -