घरताज्या घडामोडीभोसरी भूखंड घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा, २५ एप्रिलपर्यंत अटकेपासून...

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा, २५ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टाने दिलासा कायम ठेवला आहे. भोसरी भूखंड घोटाळ्यात मंदाकिनी खडसेंची चौकशी सुरु आहे. कोर्टाने मंदाकिनी खडसे यांना २५ एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी जमीन घोटाळा केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंदाकिनी खडसेंची आतापर्यंत १५ वेळा चौकशी करण्यात आली आहे. मंदाकिनी खडसे चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना दिलासा देण्याची मागणी वकिलांनी कोर्टात केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी चौकशी सुरु आहे. भूखंड घोटाळ्यात मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी याच्यावरही आरोप करण्यात आला आहे. गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली असून त्यांनी जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २५ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनवाणी करताना त्यांना २५ एप्रिलपर्यंत दिलासा कायम ठेवला आहे.

- Advertisement -

एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे तसेच जावई गिरीश चौधरी यांच्यावर ईडीची कारवाई सुरु आहे. जमीन व्यवहारात मनी लॉंड्रिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि जावई गौरव चौधरी यांच्या कंपनीसह आणखी तीन कंपन्यांचा समावेश आहे.

प्रकरण काय आहे?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी भूखंड एकनाथ खडसे यांनी खरेदी केला होता. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपयेही भरण्यात आले. सदर जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. व ती ९९ वर्षांच्या कराराव खरेदी करण्यात आली असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन जमीन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

- Advertisement -

हेही वाचा : मोठी बातमी! राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर 72 टक्के मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -