घरदेश-विदेशन्यूझीलंडला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा मागे

न्यूझीलंडला भूकंपाचा तीव्र धक्का, त्सुनामीचा इशारा मागे

Subscribe

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या उत्तरेला असलेल्या केरमाडेक बेटांवर गुरुवारी भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी नोंदवली गेली. यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने काही वेळातच त्सुनामीचा इशारा जारी केला होता. गुरुवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:56 वाजता हा भूकंप झाला.

भूकंपाचे केंद्र केरमाडेक बेटांपैकी सर्वात मोठ्या राऊल बेटाच्या सुमारे 195 किलोमीटर (121 मैल) दक्षिण-पूर्वेस किंवा ऑकलंडच्या उत्तर-पूर्वेला सुमारे 1,125 किलोमीटर (700 मैल) अंतरावर होते. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, हा भूकंप न्यूझीलंडमध्ये चीनच्या वेळेनुसार 8.56 वाजता झाला.

- Advertisement -

या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल होती. आधी 7.1 तीव्रतेचा अंदाज वर्तवण्यात आला होता, असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले. हा भूकंप समुद्रसपाटीपासून 22 किलोमीटर (14 मैल) खाली होता, त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळू लागल्या. त्यानंतर लगेचच केरमाडेक बेटे, फिजी, न्यूझीलंड आणि टोंगा यांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला, परंतु कोणताही धोका नसल्याचे निश्चित झाल्यावर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला.

- Advertisement -

राऊल बेटावर दोन ठिकाणी त्सुनामी लाटा उसळल्या पण त्या फार मोठ्या नसल्याचे दिसले, असे पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने सांगितले. ही दोन्ही ठिकाणे कायमस्वरूपी निर्जन आहेत. न्यूझीलंडचे केरमाडे बेटे आणि आजूबाजूचा परिसर कथित पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा भाग आहे. हा भाग भूकंपांचे केंद्र मानले जाते. या प्रदेशात ज्वालामुखीचा उद्रेकही होतो. या महिन्याच्या सुरुवातीला, केरमाडेक बेटांजवळ प्रशांत महासागरात 6.9 तीव्रतेचा शक्तिशाली परंतु खोल भूकंप झाला. याआधी जून 2019 मध्ये, 7.2 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे राऊल बेटावर लहान त्सुनामी आली होती.

गेल्या महिन्यात तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर दोन लाखांहून अधिक लोक जखमी झाले होते

हेही वाचा – सीमावाद पुन्हा पेटणार? महाराष्ट्राने जाहीर केलेला निधी कर्नाटक रोखणार, बोम्मईंचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -