मुंबईत एकाच इमारतीत दोघांच्या आत्महत्या, कांदिवलीत खळबळ

maharashtra at top in suicides due to unemployment ncrb report

Two Committed suicide in Mumbai | मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हत्या, आत्महत्यांच्या घटनेत वाढ होत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील कांदिवली परिसरातून येत आहे. कांदिवलीतील एकाच इमारतीत दोघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या दोघांनीही काही मिनिटांच्या अंतराने आत्महत्या केली. यामध्ये एका १८ वर्षीय तरुणतर ५६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कांदिवलीतील एका इमारतीत एका ५६ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या मुलीची गर्भधारणा होत नसल्याने ती नैराश्येत होती. या नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर, दुसऱ्या घटनेत एका १८ वर्षीय तरुणाने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. अभ्यासावरून त्याचे वडिल त्याला ओरडले असल्याने त्या रागातून त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. या दोन्ही घटनांचा सखोर तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा – मुलुंडच्या आगीत ८० जणांची सुटका तर १० जखमी

लालबागमध्ये आईची हत्या

मुंबईच्या लागबागमधील एक फ्लॅटमध्ये कपाटात प्लॅस्टिक बॅगेत बांधून ठेवलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. हा मृतदेत एका ५३ वर्षीय महिलेचा असून अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर काही तासांतच या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मुंबईत मंगळवारच्या मध्यरात्री . लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरात असलेल्या एका फ्लॅटमधून रात्री उशिरा ग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या घराची पाहणी केली. कपाट तपासलं असता, त्यामध्ये प्लास्टिकची एक मोठी पिशवी आढळली. या पिशवीमध्ये एका ५० -५५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले फ्लॅट सील करण्यात आला.

हेही वाचा – मुंबईतल्या ‘त्या’ महिलेच्या हत्येचा उलगडा, मुलीनेच केली विधवा आईची हत्या