घरदेश-विदेश९६ वर्षाची विद्यार्थीनी!

९६ वर्षाची विद्यार्थीनी!

Subscribe

केरळच्या ९६ वर्षाच्या आजी चौथीमध्ये शिकत आहेत. या वयात त्या हातात वही आणि पेन घेऊन शिक्षण घेत आहेत. आजींची ही शिक्षणाची आवड आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श आहे.

हल्लीच्या मुलांना शिक्षणाचा कंटाळा येतो. शिक्षणाचा कंटाळा आला की ही मुलं अर्धवट शिक्षण सोडून देतात. अशा मुलांसाठी आदर्श ठरल्या आहेत केरळमधल्या कर्थयायनी अम्मा. ९६ वर्षाच्या या आजींना या वयातही शिक्षणाची खूप आवड आहे. १० पर्यंत शिक्षण घेण्याचा निर्णय आजींनी घेतला आहे. साक्षरता मिशनमध्ये त्यांनी चौथीला एडमिशन घेतले आहे. या वयात त्यांना असलेली शिक्षणाची आवड आज जगासमोर एक आदर्श ठरला आहे.

९६ व्या वर्षी हातात घेतला पेन आणि वही

साठीनंतर अनेक वयोवृध्द थकतात. या वयामध्ये कोणी नातवंडांसोबत खेळतात. तर कोणी गुडघे आणि कंबर दुखीने त्रस्त असतात. पण केरळच्या या ९६ वर्षाच्या आजी यांना या वयात शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. हातात पेन आणि वही घेऊन त्या रोज अभ्यास करतात. या वयात अनेकांचे हात धरधर कापतात. पण आज्जी हातात पेन आणि वही घेऊन गणित सोडवतात, तर इंग्रजी लिहण्याचा सराव करतात. आजींची या वयात असलेली शिक्षणाची आवड पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

- Advertisement -

अम्मा इंग्रजी सुध्दा शिकणार आहेत!

केरळच्या अलप्पूझा जिल्ह्यातील चेप्पड गावात या आजी रहातात. जानेवारी २०१८ मध्ये चेप्पड ग्रामपंचायतीची साक्षरता टीम या गावातील लक्ष्मी वेदू कॉलनीत रहाणाऱ्या वयोवृध्दांच्या साक्षरतेसाठी प्रयत्न करत होते. या कॉलनीमध्ये रहाणाऱ्या अनेक वयोवृध्दांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र कर्थयायनी अम्मा यांनी यामध्ये सहभागी होण्याची इच्छा वर्तवली. अम्मा सध्या गणिताचे शिक्षण घेत आहेत. त्या ३ पर्यंत पाढे पाठ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे त्या मल्याळम भाषेतील अक्षरांचा देखील सरवा करत आहेत. येणाऱ्या वर्षात अम्मांना उत्तम इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे.

मुलीपासून घेतली प्रेरणा

अम्मांनी त्यांची मुलगी अम्मिनी हिच्याकडून शिक्षणाची प्रेरणा घेतली आहे. अम्मिनी यांना अभ्यास करताना पाहून अम्मांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. अम्मांची मुलगी ६० वर्षाची असून त्यांनी साक्षरता मिशनचा कोर्स केला आहे. साक्षरता मिशनचा हा कोर्स १०वी सारखाच असतो. अम्मांनी शिक्षणासाठी पुढाकारानंतर जवळपास ३० वयोवृध्दांनी या कोर्ससाठी नाव नोंदणी केली.

- Advertisement -

१२ वर्षाच्या असताना सोडले शिक्षण

कर्थयायनी अम्मांचे वडील शिक्षक होते. तरी देखील आज्जींनी त्यावेळी शिक्षण घेतले नाही. आज्जी १२ वर्षाच्या असताना त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने शिक्षण सोडले. त्यानंतर दोघी घरा जवळच्या मंदिरामध्ये काम करु लागल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -