घरदेश-विदेशनववीतील विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयात आढळला

नववीतील विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयात आढळला

Subscribe

वडोदरा येथील शाळेच्या शौचालयात नववीतील विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. यासंबंधीची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. धारदार शस्त्राने विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुजरातमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या शौचालयात आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडोदरा जिल्ह्यातील बारनपोरा परिसरातील श्री भारती विद्यालयात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि पालकांनी शाळेबाहेर गोंधळ घातला. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या आपापसातील भांडणामुळे ‘त्या’ मुलाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत विद्यार्थ्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या असून पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. शाळेच्या शौचालयात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गुरूग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सातवीत शिकणाऱ्या प्रद्युम्नची हत्या शाळेच्या शौचालयात करण्यात आली होती.

- Advertisement -

भांडणातून हत्या झाल्याचा संशय

दहावीच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात ‘त्या’ मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या बाजूला एक चाकू देखील पोलिसांना सापडला आहे. याच चाकूने त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यासोबत झालेल्या भांडणातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. काल हा विद्यार्थी मधल्या सुट्टीत मृत मुलासोबत बोलण्याकरता आला होता. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. दोघांमधील भांडणच या घटनेला कारणीभूत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सध्या हा दहावीतील विद्यार्थी फरार आहे.

दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून त्यासाठी शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाणार आहे. पोलिसांच्या मते संशयित फरार विद्यार्थी वडोदरा येथे त्याच्या नातलगासोबत राहत असून त्याने नुकतेच या शाळेत प्रवेश घेतला होता. तर त्याचे पालक आनंद जिल्ह्यात राहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -