घरलाईफस्टाईलअंड शाकाहारी की मांसाहारी?

अंड शाकाहारी की मांसाहारी?

Subscribe

या वैज्ञानिकांनी अंड शाकाहारी की मांसाहारी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. नक्की अंड शाकाहारी की मांसाहारी?

पहिलं अंड की पहिले कोंबडी हा प्रश्न वर्षानुवर्षाचा तसाच आहे. तर अंड शाकाहारी आहे की मांसाहारी हादेखील प्रश्न बऱ्याच जणांना असतो. ज्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालं नाही. याविषयी बऱ्याच चर्चा नेहमीच रंगत असतात. मात्र आता या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे. या वैज्ञानिकांनी अंड शाकाहारी की मांसाहारी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. हे सांगूनही बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटेलच असं नाही. पण वैज्ञानिकदृष्टया सिद्ध झालेल्या नक्की गोष्टी काय आहेत हे खास तुमच्यासाठी.

मांसाहारी की शाकाहारीमागील लॉजिक?

शाकाहारी लोक अंड्याला मांसाहारी समजून खात नाहीत. कोंबडी अंड देते त्यामुळं अंड मांसाहारी असतं असं लोकांचं म्हणणं असतं. मात्र, दूधदेखील गाय आणि म्हशीसारखे प्राणीच देतात तर मग दूध शाकाहारी कसं? असा प्रश्न वैज्ञानिकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

अंड हे शाकाहारीच

बऱ्याच लोकांची समजूत असते अंड्यातून कोंबडीचं पिल्लू येतं. त्यामुळं अंड हे मांसाहारीच असतं. मात्र बाजारात मिळणारी जास्त अंडी ही अनफर्टिलाईज्ड असतात. त्यामुळं त्यातून कोंबडीची पिल्लं बाहेर येऊ शकत नाहीत. ही शंका ज्या लोकांना आहे त्या लोकांना वैज्ञानिकांनी उदाहरण देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं वैज्ञानिकांच्या मते, अंड हे शाकाहारीच आहे.

कसं समजलं?

खरंतर, अंड्यामध्ये तीन भाग असतात. पहिला भाग म्हणजे कवट, दुसरा सफेद भाग म्हणजे कवच (albumen) आणि तिसरा पिवळा भाग म्हणजे बलक (yolk). अंड्यावर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, अंड्यातील सफेद भागामध्ये केवळ प्रोटीन असतं. त्यामध्ये कोणताही प्राण्याचा संबंध नसतो. त्यामुळं अंड हे शाकाहारी असतं.

- Advertisement -

कोंबडी अंड कसं देते?

कोंबडी जेव्हा ६ महिन्यांची होते. त्यानंतर दर दीड दिवसांनी अंडं द्यायला लागते. पण त्यासाठी कोणत्या कोंबड्याशी तिचा संबंध आलेला असतो असं नाही. हीच अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. वैज्ञानिकांच्या मते, यामधून कधीही पिल्लं बाहेर येत नाहीत, त्यामुळं अंड हा मांसाहारी प्रकार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -