घरदेश-विदेशशाळेत छत्री उघडून बसतात विद्यार्थी!

शाळेत छत्री उघडून बसतात विद्यार्थी!

Subscribe

कर्नाटकाच्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठ्या प्रमाणात छतगळती होत आहे. ही छतगळती इतकी आहे की, आपली पुस्तकं आणि वह्या वाचवण्यासाठी मुलांना छत्री घेऊन बाकावर बसावे लागत आहे.

शंभर टक्के शाळेचा निकाल लागणाऱ्या बऱ्याच शाळांच्या कथा आपण एेकल्या असतील. परंतु, कर्नाटकाच्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेची कथा ही फार आगळीवेगळी आहे. या शाळेतील मुलांना पावसाळ्यात वर्गात छत्री उघडून बाकावर बसावे लागते. या शाळेत मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यामुळे नाईलाजाने विद्यार्थ्यांना आपली वह्या-पुस्तकं वाचवण्यासाठी छत्री उघडून बसावे लागते. ही शाळा कर्नाटक राज्यातील हासन जिल्ह्याच्या अराकलगुड गावाची जिल्हापरिषद शाळा आहे. या शाळेचे एसएसएलसी असे नाव आहे. या शाळेत एकूण ८ वर्ग आहेत. यापैकी २ वर्गांचा उपयोग कार्यालयीन कामांसाठी केला जातो. उरलेल्या सहापैकी तीन वर्ग पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात छतगळती होत असल्याने बंद ठेवले जातात. उलेल्या तीन वर्गांमध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षण घेतात. या तीन वर्गांमध्येही छतगळती होते.

५० वर्षे जुनी शाळा

ही ५० वर्ष जुनी शाळा आहे. तरीही प्रशासनाचे या शाळेकडे लक्ष नाही. पावसाळ्यात या शाळेमध्ये पाणी साचते. या शाळेत एकूण १८७ विद्यार्थी आहेत. यापैकी ८७ विद्यार्थी मुले तर ८१ मुली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे. शाळेतला शिक्षणाचा दर्जाही चांगला आहे.

- Advertisement -

लोकांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा

कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एच. डी. रेवन्ना हे दोघेही हासन जिल्ह्याचे आहेत. आपल्याच जिल्ह्याचे मंत्री असल्यामुळे आपल्या जिल्ह्याकडे त्यांचे विशेष लक्ष असेल अशी आशा येथील नागरिकांना आहे. त्याचबरोबर आता मुख्यमंत्री शाळेच्या डागडुजीकडे लक्ष देतील, अशीही अपेक्षा तेथील नागरिकांच्या मनामध्ये आहे.

मुलांना छत कोसळण्याची भीती

शाळेचे मुख्यध्यापक शिवप्रकाश यांनी सांगितले की, ‘आमच्या इथे वर्गांची कमतरता आहे. शाळेच्या डागडुजीचा प्रस्ताव आम्ही प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे सादर केला आहे. गेल्यावर्षी पंचायत समितीचे सदस्य रेवन्ना यांनी दोन लाख रुपयांची मदत केली होती. या दोन लाख रुपयांमध्ये तीनच वर्गांची डागडुजी आम्हाला करता आली’. याशिवाय शाळेचे छत कधीही कोसळण्याची भीती येथील विद्यार्थ्यांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -