मुंबई : केंद्र सरकारने सैनिक शाळांची दारे खासगी क्षेत्रासाठी खुली केल्यानंतर, 62 टक्के नवीन सैनिक शाळा भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. यामुळे मोदी सरकारच्या धोरणाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Loksabha Election 2024 : रायगडमध्ये आठवेळा खासदार देणारा काँग्रेस पक्ष आहे कुठे?
केंद्र सरकारची प्रसिद्धी पत्रके तसेच माहिती अधिकारअंतर्गत (RTI) विचारलेल्या उत्तरांमधून सैनिकी शाळांबद्दलची माहिती समोर आली. आतापर्यंतच्या 40 सैनिक शाळांच्या झालेल्या करारांपैकी किमान 62 टक्के करार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि त्याच्या सहयोगी संघटना, भाजपाचे नेते, त्यांचे राजकीय मित्रपक्ष आणि मित्र, हिंदुत्ववादी संघटना यांच्याशी संबंधित असल्याचे आमचा निष्कर्ष असल्याचे द रिपोटर्स कलेक्टिव्हने म्हटले आहे.
Another propaganda exercise run on our tax payer’s monies. As per a detailed report by @reporters_co out of the 40 schools under Sainik School Society, an autonomous body under Ministry of Defence that has been opened to Public Private Partnership Model by the BJP Government, 11…
— Supriya Sule (@supriya_sule) April 3, 2024
यावरून खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपावर निशाणा साधला आहे. आम्हा करदात्यांच्या पैशांवर आणखी एक प्रचार फंडा चालवला जात आहे. द रिपोटर्स कलेक्टिव्ह दिलेल्या रिपोर्टनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील स्वायत्त संस्था असलेल्या सैनिक स्कूल सोसायटीअंतर्गत 40 शाळा येतात. या शाळा भाजपा सरकारने सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून खुल्या केल्याने यापैकी 11 शाळा थेट भाजपा नेत्यांच्या मालकीच्या बनल्या आहेत किंवा त्यांचे व्यवस्थापन या नेत्यांच्या अध्यक्षतेखालील ट्रस्टद्वारे केले जाते. तर, त्यातील काही भाजपा नेत्यांच्या मित्रांच्या किंवा भाजपाच्या राजकीय मित्रपक्षांशी संबंधित आहेत. शिवाय, 8 शाळांचे व्यवस्थापन आरएसएस आणि त्याच्या सहयोगी संघटनांकडे आहे. सहा शाळांचे अशा संघटनांशी थेट करार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त, 9 मंत्र्यांसह 54 खासदारांचा कार्यकाळ समाप्त
भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी इच्छुक भावी अधिकाऱ्यांची मनोभूमी तयार करण्याचे धोरण भाजपा सरकारचे असून त्या हेतूबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आपण आपल्या तरुणांना एका विशिष्ट विचारप्रक्रियेस प्रेरित करत आहोत का? असा सवाल उपस्थित करतााच, वैचारिक प्रवृत्तीच्या धोक्यांचे स्मरण जागतिक इतिहास करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Lok Sabha : प्रणिती शिंदेंकडून भीती व्यक्त, तर राम सातपुते म्हणतात, त्या आमच्या भगिनी