घरदेश-विदेशSushant Singh Suicide: धक्कादायक! सुशांत सिंहचा 'छिछोरे' बघून मुलीने केली आत्महत्या

Sushant Singh Suicide: धक्कादायक! सुशांत सिंहचा ‘छिछोरे’ बघून मुलीने केली आत्महत्या

Subscribe

या मुलीने आत्महत्येपूर्वी सुशांतचा छिछोरे हा चित्रपट पाहिला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली असून या घटनेला एक महिना उलटून गेला. सुशांतची हत्या की आत्महत्याचा याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा अनेकांच्या चौकशा देखील घेत आहे. मात्र, बॉलिवूड विश्व आणि त्याचे चाहते अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत छत्तीसगडच्या भिलाई येथे सुशांतची चाहती असलेल्या मुलीने आत्महत्या करून स्वतःचा जीव संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केल्यानंतर तिच्याकडे सुसाइड नोट सापडली आहे.

सुशांतच्या मृत्यूचा बसला धक्का 

यामध्ये तिने असं म्हटलं की, सुशांत सिंहच्या मृत्यूने तिला जबरदस्त धक्का बसला होता. तिच्या आवडत्या अभिनेत्याच्या मृत्यूने ती खूप दुःखी होती. त्यामुळे तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, असा मजकूर या चिठ्ठीत लिहिला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुशांत सिंहचा ‘छिछोरे’ हा चित्रपटही पाहिला होतो असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

आत्महत्येपूर्वी सुशांतचा छिछोरे चित्रपट पाहिला होता

या मुलीचे वडील हे रायपूरमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्यांना तीन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीने आत्महत्या केली. बुधवारी सकाळी तिची आई दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरात मुलगी एकटीच होती. चौकशी केली असता, या मुलीने आत्महत्येपूर्वी सुशांतचा छिछोरे हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर तिने वडिलांसोबत सुशांत सिंह राजपूत आणि छिछोरे चित्रपटाबद्दल चर्चाही केली असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.

मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत

मुलीसोबत बसून तिच्या वडिलांनीही चित्रपट पाहिला होता. त्यानंतर वडिलांनी बाजारात सोबत येण्यासाठी तिला विचारले मात्र, तिने नकार दिला. संध्याकाळी साधारण पाच वाजताच्या सुमारास वडिल बाजारात गेले होते. ते परत आल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. तिच्या वडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्यांनी धाव घेतली. मुलीच्या गळ्याभोवतीचा फास काढून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


सुशांत सिंह राजपूतला Dil Bechara टीमने वाहिली सांगितिक श्रद्धांजली!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -