घरदेश-विदेशओडिसाचे 'फकीर' मोदींच्या मंत्रीमंडळात!

ओडिसाचे ‘फकीर’ मोदींच्या मंत्रीमंडळात!

Subscribe

राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्याकडे सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय,पशूसंवर्धन,मस्त्योद्योग ही खाती सोपवण्यात आली आहेत.

मोदी सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात राष्ट्रपतीभवनात पार पडला. या शपथविधी सोहळ्यात एक चेहरा लक्षवेधी ठरला तो म्हणजे ओडीसाचे खासदार प्रतापचंद्र सारंगी. गुरूवारी सारंगी यांनी राष्ट्रपती भवनमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एक फकिर नेता अशी त्यांची ओडीसामध्ये ओळख आहे. प्रतापचंद्र सारंगी हे शपथविधीसाठी मंचावर आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींप्रमाणेच खासदार प्रतापचंद्र सारंगी हे लोकप्रिय आहेत. ओडीसामध्ये अनेकजण त्यांना मोदी म्हणूनही संबोधतात. सध्या सोशल मीडियावर प्रतापचंद्र सारंग यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे.

- Advertisement -

या मागे कारणही तसेच आहे. प्रतापचंद्र सारंगी हे अतिशय साध राहणीमान जगतात. ओडिसासारख्या तुलनेत मागास राज्यातील बालासोर मतदारसंघातून खासदार बनलेले प्रतापचंद्र सारंगी यांनी गेली कित्येक वर्षे सामाजिक कार्यात घालवलेली आहेत. सारंगी यांचा अध्यात्माकडे अधिक ओढा आहे. यासाठी ते अनेवेळा रामकृष्ण मठात गेले. त्यानंतर त्यांनी लोकसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. सारंगी यांचे उडिया आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्त्व आहे.

- Advertisement -

सारंगी यांचे साधे राहणीमान

सारंगी यांचे राहणीमान अतिशय साधे आहे. काही दिवसांपूर्वी खासदार म्हणून निवडून आल्यावर सारंगी यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते. कोणताही बडेजाव न करता अंगावर साधा कुर्ता आणि खांद्यावर बॅग घेऊन ते दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर निवडणूकीचा प्रचारही त्यांनी सायकलवरून केला होता.तर ग्रामपंचायत येथील बोअरवेलवर आंघोळ करतात. सारंगी यांच्याकडे फक्त साडे सोळा लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर सारंगी यांचे प्रतिस्पर्धी नवज्योती पटनायक यांची संपत्ती १०४ कोटी रुपये इतकी असून बिजू जनता दलाचे रविंद्र जेना यांची संपत्ती ७२ कोटी रुपये इतकी होती.

प्रतापचंद्र सारंगी

सामाजिक कार्यावर भर

प्रतापचंद्र सारंग यांचा जन्म हा नीलगिरीतील गोपीनाथपूर गावामध्ये झाला. दारुबंदीसाठीही त्यांनी मोहीम राबवली होती. सारंगी हे ओडिशात विश्व हिंदू परिषदेत सक्रीय होते. त्यांनी बजरंग दलाचे ओडिसातील अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. बालासोर आणि मयूरभंजमधील आदिवासी भागात सारंग यांनी काही शाळा सुरू केल्या. संपूर्ण आयुष्य त्यांनी जनसेवेसाठी अर्पण केले आहे.

राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्याकडे सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय,पशूसंवर्धन,मस्त्योद्योग ही खाती सोपवण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -