घरताज्या घडामोडीTaliban- अफगाण वृत्तवाहिन्यांवर तालिबान राज, बेदरकार नजरा, खांद्यावर बंदुका आणि भेदरलेला अँकर

Taliban- अफगाण वृत्तवाहिन्यांवर तालिबान राज, बेदरकार नजरा, खांद्यावर बंदुका आणि भेदरलेला अँकर

Subscribe

अफगाण वृत्तवाहीनीवरील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात बंदुकधारी तालिबान्यांच्या गराड्यात अँकर बोलत असतानाचे दिसत आहे

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यापासून सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. तालिबान्यांच्या नागरिकांवरील अत्याचाराच्या बातम्या रोज झळकत आहेत. याचदरम्यान, अफगाण वृत्तवाहीनीवरील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात बंदुकधारी तालिबान्यांच्या गराड्यात अँकर बोलत असतानाचे दिसत आहे. जगात असा प्रकार कधीही घडलेला नसल्याने हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असून तालिबान्यांकडून पत्रकारीतेचा आवाज दाबला जात असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानमधील पत्रकार हिझबुल्लाह खान यांनी टि्वटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अफगाण वृत्तवाहीनीच्या कार्यालयातील स्टुडिओमधला हा व्हिडीओ आहे. यात अँकर तालिबानची मुलाखत घेत असताना इतर तालिबानी खांद्यावर बंदुका लटकवून त्याच्याभोवती उभे राहील्याचे दिसत आहे.

- Advertisement -

कियान शरीफ यांनी यावर ट्विट केलं आहे. अफगाण टीव्हीच्या परदाज या कार्यक्रमात बंदुकीच्या धाकावर तालिबान्यांनी मुलाखत दिली. तसेच अँकरच्या मागे उभे राहून त्याला #अफगाणिस्तानच्या लोकांना इस्लामिक अमिरातीपासून घाबरू नये असे सांगण्यास भाग पाडत असल्याचे म्हटले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -