घरदेश-विदेशप्रश्नांची उत्तरे न दिल्याने शिक्षकांनी उपटले चिमूरडीचे केस

प्रश्नांची उत्तरे न दिल्याने शिक्षकांनी उपटले चिमूरडीचे केस

Subscribe

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्याने शिक्षकाने सहा वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण केली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांना शिक्षकांविरोधात तक्रार केली आहे.

शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यामुळे एका चिमुरडीला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली आहे. लखनऊमधील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला आहे. शिक्षकांनी चिमूरडीचे केस उपटून तिला अमानुष मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पीडित चिमूरडी ही पहिल्या इयत्तेत शिकत होती. बोर्डावर लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरे ना दिल्यामुळे शिक्षकांना राग आला. तिच्यावर ओरडत मारहाण केली. दरम्यान या घटनेमुळे चिमूरडी घाबरली आहे.

कशी घडली घटना

लखनऊमध्ये ‘नोव्हेल अकॅडमी’ या खाजगी शाळेत हा प्रकार घडला. विनोद कुमार असे या शिक्षकाचे नाव आहे. मागील काही महिन्यांपासून विनोद शाळेत शिकवत होता. पीडित चिमूरडीचे नाव अन्नू असे आहे. या शाळेत ती पहिल्या इयत्तेत शिकत होती. हा प्रकार शुक्रवारी घडला. विनोदने फळ्यावर काही प्रश्न लिहिले होते. या प्रश्नांची उत्तरे देता न आल्यामुळे विनोदने अन्नूचे केस ओढले व तिला मारहाण केली. असा आरोप चिमूरडीची आई वनीया यांनी केला आहे. मुलगी रडत घरी आल्यानंतर तिला विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याबद्दल प्राध्यापकांना तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांकडेही तक्रार नोंंदवण्यात आली.

- Advertisement -

“माझी मुलगी घरी आल्यावर घाबरली होती. माझ्या जवळ आल्यावर तिने हंबरडा फोडला. शाळेत घडलेला प्रकार तिने सांगितला. आज जर शिक्षक अशी मारहाण करत असतील तर उद्या कोणीही मारहाण करु शकते.”- वनिता, पीडित मुलीची आई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -