घरदेश-विदेशपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी जम्मूत दहशतवादी हल्ला, लष्कराचा एक जवान शहीद

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी जम्मूत दहशतवादी हल्ला, लष्कराचा एक जवान शहीद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला दोन दिवस उरलेले असताना जम्मूच्या सुजवा आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जैश ए मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं असून सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

सध्या जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफकडून कारवाई सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा जिल्ह्याच्या नियोजित दौऱ्याच्या दोन दिवस आधी जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना सुजवामध्ये चकमकीची ही घटना घडली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफने या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. त्यांनी सांगितले की, चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून अन्य चार जण जखमी झाले आहेत. सीआयएसएफचे एएसआय एसपी पटेल हे जवान शहीद झाले आहेत. कठुआचे पोलीस हेडकॉन्स्टेबल बलराज सिंह, अखनूरचे एसपीओ साहिल शर्मा, ओडिशाचे सीआयएसएफचे प्रमोद पात्रा आणि आसामचे अमीर सोरण हे जखमी झाले आहेत.

- Advertisement -

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित किमान दोन दहशतवादी असल्याच्या विशिष्ट माहितीवरून शोध मोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांना पाहताच दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही गोळीबार सुरु केला. या भागात सुरक्षा दल पाठवण्यात आले असून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १० फेब्रुवारी २०१८ रोजी तीन दहशतवाद्यांनी सुजवा आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. या चकमकीत सहा जवानांसह सात जण ठार झाले होते. त्याचवेळी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

मोदींचा कार्यक्रम घटनास्थळापासून १७ किमी दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त या ठिकाणाहून १७ किमी अंतरावर असलेल्या पाली गावात सभेला संबोधित करणार आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा असेल. यापूर्वी, त्यांनी २७ ऑक्टोबर २०१९ रोजी राजौरी येथे आणि ३ नोव्हेंबर २०२१ रोजी जम्मू विभागातील नौशेरा सेक्टरमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -