घरमहाराष्ट्रगणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार

गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार

Subscribe

अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

ऐरोलीचे भाजप आमदार आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला. यामुळे गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांच्या अंतरिम जामिनावर येत्या 27 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान या पीडित महिलेने बलात्कार आणि धमाकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. गणेश नाईक यांच्यासोबत गेल्या 27 वर्षांपासून आपण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून त्यांच्यासोबतच्या संबंधातून 15 वर्षांचा मुलगा झाला आहे. गणेश नाईक यांनी आपल्या मुलाला वडिलांचे नाव द्यावे, अशी मागणी या पीडित महिलेने केली आहे.

- Advertisement -

त्यानुसार गणेश नाईक यांच्याविरोधात रिव्हॉल्वर दाखवून धमकावणे आणि बलात्काराचा आरोप असे दोन्ही खटले ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहेत. त्यामध्ये दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. या दोन्ही खटल्यातील अंतरिम जामिनासंबंधी सुनावणी 27 एपिल रोजी होणार आहे.

जीवाला धोका
गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून जर नाईकांना अटकपूर्व जामीन मिळाला, तर माझ्यासह मुलाच्या जीवाला धोका असल्याचा दावाही पीडित महिलेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -