घरदेश-विदेशकाश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर अतिरेकी हल्ला

काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर अतिरेकी हल्ला

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला झाला आहे. आज सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुदैवाने एकही जीवित हानी झालेली नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरूवारी पुन्हा जम्मू-काश्मीरच्या सोपोर विभागात सीआरपीएफच्या जवानांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. सुदैवाने या अतिरेकी हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. सीआरपीएफच्या नेतृत्त्वात सुरक्षा दलांच्या संयुक्त टीमने परिसराला वेढा घालत अतिरेक्यांचा शोध सुरु केला. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांची संख्या तीन ते चार असल्याचे सांगितले जात आहे.

१७९ बटालियनच्या जवानांवर हल्ला

सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही घटना गुरुवारी दुपारी घडली. सीआरपीएफच्या १७९ बटालियनच्या जवानांना सोपोरच्या आझाद बाबा क्रॉसिंग येथे लॉ अॅण्ड ऑर्डर ड्युटीसाठी तैनात केले होते. दरम्यान, तीन ते चार अतिरेक्यांनी या ठिकाणी येऊन जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. अतिरेक्यांनी साधारणत: पाच मिनिटे गोळीबार चालू ठेवला.

- Advertisement -

जवानांच्या गोळीबारासमोर अतिरेक्यांची पीछेहाट

अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांच्या अनुषंगाने जवानांना सर्तकतेचा इशारा दिला होता. या इशाऱ्यामुळेच ड्युटीवर तैनात जवान अगोदरपासूनच सतर्क होते. अचानक झालेल्या फायरिंगमध्ये स्वत:ला वाचवत जवानांनी अतिरेक्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार सुरु केला.

शस्त्रास्त्रे लुटण्याचा होता हेतू

सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिरेकी हल्ल्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसून, सर्व जवान सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत अतिरेक्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले. असं सांगितलं जातंय की, लष्कराची शस्त्रास्त्रे लुटण्यासाठी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. मात्र, जवानांनी त्यांचा हा मनसुबा हाणून पाडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -