घरताज्या घडामोडीTexas Hostage case : टेक्सास अपहरण नाट्याचे पाकिस्तान कनेक्शन, १२ तासांनी FBI...

Texas Hostage case : टेक्सास अपहरण नाट्याचे पाकिस्तान कनेक्शन, १२ तासांनी FBI च्या मोहिमेला यश

Subscribe

अमेरिकेच्या टेक्सास(Texas) मध्ये यहूदी पूजा स्थळाच्या ठिकाणी (सिनेगॉग) मध्ये ओलीस ठेवण्यात आलेल्या चार लोकांना अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षित सोडवण्यात अमेरिकन सुरक्षा यंत्रणांना यश आले. टेक्सासमधील डलासच्या कोलिवले येथे एफबीआय मार्फत झालेल्या कारवाईत एक संशयिताचा मृत्यू झाला. या कारवाईत सर्व ओलीस ठेवण्यात आलेल्या लोकांना सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले आहे. टेक्सासच्या गर्व्हनर ग्रेग एबॉट यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मलिक फैजल अक्रम ही ४४ वर्षीय संशयित व्यक्ती ब्रिटनचा नागरिक असून पाकिस्तान अमेरिकन न्यूरो साइंटिस्ट शास्त्रज्ञ असलेल्या आफिया सिद्दीकीच्या (Aafia siddiqui) सुटकेच्या मागणीसाठी या चार जणांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती आहे. टेक्सासमधील घटनेनंतर दहशतवादा विरोधात पाकिस्तानची भूमिका ही वादाच्या फेऱ्यात आली आहे.

कोण आहे हल्लेखोर व्यक्ती ?

मलिक फैजल अक्रमची ओळख एफबीआयने पटवली आहे. आफिया सिद्दीकीच्या सुटकेसाठी त्यांनी हे अपहरण नाट्य घडवून आणल्याचे समोर आले आहे. आफिया सिद्दीकीला दहशतवाद कनेक्शन प्रकरणातील आरोपांमुळे ८६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या आफिया कार्सवेल येथे फेडरल मेडिकल सेंटरमध्ये कैदेत आहे. तब्बल १२ तास चाललेल्या ऑपरेशननंतर ओलीस असलेल्या चारही नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. कारवाईनंतर आफिया सिद्दीकीच्या वकिलांनी स्पष्ट केले की अपहरणकर्ता आफियाच्या भाऊ नाही. त्यामुळे आफियाच्या नावे अशा प्रकारची कोणतीही हिंसा किंवा कारस्थान अपेक्षित नाही. टेक्सासच्या अपहरण नाट्यात या व्यक्तीने आपल्याकडे बॉम्ब असल्याचाही दावा केला होता.

- Advertisement -

माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार या अपहरणा नाट्याच्या प्रसंगादरम्यान सिनेगॉगमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे प्रसारण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू होते. त्या दरम्यानच एक बंदुकधारी व्यक्ती आत घुसली. त्यानंतर त्या व्यक्तीने चार जणांना ओलीस ठेवले. तब्बल १२ तास चाललेल्या ऑपरेशननंतर एफबीआयच्या होस्टेज रेस्क्यू टीमने टीम क्वांटिको येथून सिनेगॉग येथे पोहचून ओलीस असलेल्या चारही जणांची सुटका केली. त्यासोबतच अपहरणकर्त्या व्यक्तीला लक्ष्य केले. या घटनेत अपहरणकर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आफिया सिद्दीकीच्या सुटकेच्या मागणीसाठी पाकिस्तानने वारंवार अमेरिकेकडे प्रयत्न केले आहेत. आफिया सिद्दीकीवर अलकायदासोबत अमेरिकेविरोधात कारवाया करण्याचा आरोप आहे. तिला लेडी अलकायदा असेही संबोधले जाते. तर पाकिस्तानात एक वर्ग तिला डॉटर ऑफ नेशन म्हणूनही संबोधले जाते. पाकिस्तानात आफियाच्या सुटकेसाठी मोहीमही चालवण्यात आली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आफिया सिद्दीकीच्या सुटकेसाठी पार्लमेंटरी अफेयर एडव्हायजर बाबर अवानला आफिया सिद्दीकीच्या सुटकेसाठीच्या प्रयत्नासाठी सल्लागार म्हणून नेमले आहे. गेल्या एक दशकात पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये खूपच कटुता आली आहे. ओबामा, डोनाल्ड ट्रंप पाठोपाठच राष्ट्रपती जो बायडन यांनीही पाकिस्तानला तितकेसे महत्व दिले नाही.


पाकची ‘लेडी अल कायदा’ आफिया सिद्दीकी आहे तरी कोण? जिच्या सुटकेसाठी अमेरिकेत ४ जणांना ठेवले ओलीस

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -