घरदेश-विदेशThackeray group : ...या हुकूमशाही नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू, ठाकरे गटाचा...

Thackeray group : …या हुकूमशाही नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात

Subscribe

मुंबई : एकीकडे धार्मिक आणि खोट्या राष्ट्रवादाची भूल आणि दुसरीकडे लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीची चूल हेच आपल्या देशातील चित्र आहे. रशियामध्ये अपेक्षेप्रमाणे ब्लादिमीर पुतीन यांच्या विजयाचा आत्मविश्वास आणि आपल्याकडील राज्यकर्त्यांच्या ‘चारसौ पार’च्या वल्गना या हुकूमशाही नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तिकडे पुतीनशाही आणि इकडे मोदीशाही एवढाच काय तो फरक आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : अहो तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात, आम्ही…; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना उत्तर

- Advertisement -

रशियामध्ये अपेक्षेप्रमाणे ब्लादिमीर पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अपेक्षेप्रमाणे पुतीन यांनी हा विजय लोकशाहीचा असल्याचे म्हटले आहे. रशिया हे लोकशाही राष्ट्र असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. या दाव्यावर स्वतः पुतीन आणि त्यांचे अंधभक्त सोडले तर जगात कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

लोकशाहीच्या नावाखाली एकाधिकारशाही राबविणारा प्रत्येक हुकूमशहा हा देखावा आणि कांगावा करीतच असतो. आपल्या देशातही दुसरे काय चित्र आहे! गेल्या 10 वर्षांपासून असलेली मोदीशाही हा हुकूमशाहीचाच दुसरा अवतार आहे. मोदी राजवटीतही विरोधक आणि टीकाकारांची केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबीच सुरू आहे. वेगवेगळ्य़ा चौकश्यांचा ससेमिरा मागे लावून राजकीय विरोधकांना एकतर तुरुंगात टाकले जात आहे, नाहीतर भाजपामध्ये येण्यास भाग पाडले जात आहे. प्रसारमाध्यमांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Varsha Gaikwad : आता तयारी चौथ्या इंजिनची; काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका

साम, दाम, दंड, भेद आणि खोकेशाहीच्या मार्गाने विरोधी पक्षांची सरकारे उलथवली जात आहेत. फोडाफोडी करून विरोधी पक्ष खिळखिळे करण्याचे आणि भारतालाही रशियाच्याच वळणावर नेण्याचे उद्योग सत्तापक्ष सर्रास करीत आहे, असे शरसंधान ठाकरे गटाने केले आहे.

हेही वाचा – Shrinivas Pawar : घड्याळ तेच वेळ नवी; अजित पवारांवरील श्रीनिवास पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -