घरदेश-विदेशजगातली सर्वात मोठ्या आणि शक्तीशाली राॅकेटचा उड्डाणानंतर स्फोट

जगातली सर्वात मोठ्या आणि शक्तीशाली राॅकेटचा उड्डाणानंतर स्फोट

Subscribe

आतापर्यंत बनवलेले सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली राॅकेट टेक्सासमधून उड्डाण घेतले परंतु उड्डाणानंततर अवघ्या काही मिनिटांतच स्पेसएक्स राॅकेटचा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहायला मिळाले. ट्विटरवर यासंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

आतापर्यंत बनवलेले सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली राॅकेट टेक्सासमधून उड्डाण घेतले परंतु उड्डाणानंततर अवघ्या काही मिनिटांतच स्पेसएक्स राॅकेटचा स्फोट झाला आणि आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ पाहायला मिळाले. ट्विटरवर यासंदर्भातले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ( The largest and most powerful rocket ever built took off from Texas but the SpaceX rocket exploded just minutes after liftoff )

या स्टारशिप एक्स राॅकेटच्या मदतीने एक दिवस माणूस मंगळवार स्वारी करेल. मात्र, एलाॅन मस्क यांनी लाॅचिंगच्या दरम्यान स्टारशिपमध्ये स्फोट होण्याची शक्यता 50 टक्के आहे अस म्हटलं होतं.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, स्टारशिप हे एक रियुजेबल राॅकेट होतं. या राॅकेटचे दोन भाग होते. पहिला पॅसेंजर भाग ज्या भागात प्रवासी असणार होते. तर दुसरा भाग होता तो म्हणजे हेवी राॅकेट बूस्टरचा. या पूर्ण राॅकेटची उंची 120 मीटर
अर्थात सुमारे 394 फूट एवढी होती. तर वजन 50 लाख किलोग्रॅम होतं. याच राॅकेटचा स्फोट झाला आहे.

माणसाला चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी SpaceX Starship अत्यंत उपयुक्त ठरेल अस मानलं जात होतं. मात्र, लाॅंचिंगनंतर अवघ्या चार मिनिटांत हे राॅकेट फुटलं आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता स्पेसएक्स राॅकेट टेक्सासच्या बोकाचिका प्रायव्हेट स्पेसबेसहून लाॅंच करण्यात आलं. मात्र, उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटांत या राॅकेटचा स्फोट झाला. एलाॅन मस्क यांच्या मालकीची कंपनी असेल तरी त्याचं लाॅंचिंग झालं हेच आम्ही मोठं यश मानतो.

- Advertisement -

( हेही वाचा :Twitter Blue Tick: बिग बी, कोहली, CM योगींसह ‘या’ दिग्गज मंडळीचं ब्लू टीक ‘गायब’ )

SpaceX कंपनीने हेदेखील म्हटलं आहे की आज आम्ही अपयशी ठरलो असलो तरीही येत्या काळात आम्हाला यश मिळेल. आज आम्हाला जो अनुभव आला त्यातून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत. स्टारशिपची विश्वासर्हता वाढेल यासाठी आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -