घरदेश-विदेशदेशावरील संकटांना मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार जबाबदार

देशावरील संकटांना मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकार जबाबदार

Subscribe

देशावर आलेल्या संकटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार जबाबदार आहे, त्यांची चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमांवरील समस्यांचे मूळ आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.

देशावर आलेल्या संकटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार जबाबदार आहे, त्यांची चुकीची धोरणे आणि भोंगळ कारभार सीमांवरील समस्यांचे मूळ आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची एक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. देश आज आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे.

या दोन्ही संकटांसाठी एनडीए सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरण कारणीभूत आहे. तसेच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधन दरवाढ सुरू असल्यावरून देखील सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जून महिन्यापर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही मोफत धान्य योजना आणखी तीन महिन्यांसाठी वाढवावी, असे सोनिया गांधींनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

सोनिया गांधी म्हणाल्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एप्रिल ते जून या काळात प्रती व्यक्ती 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य देण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. मात्र, लॉकडाऊन आणि त्याचा होणारा परिणाम या पार्श्वभूमीवर आपण सरकारला काही सुचवू इच्छितो. लॉकडाउनचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिक आणि स्थलांतरीत मजुरांना बसला आहे. तर, अद्याप कित्येक गरिबांना या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे, मोफत धान्य पुरवठा योजना आणखी तीन महिने वाढवून, गरिबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य दिले जावे, अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -