घरदेश-विदेशअडीच लाख रुपये किंमतीच्या आंब्याच्या सुरक्षिततेसाठी मालकने तैनात केले 3 गार्ड अन्...

अडीच लाख रुपये किंमतीच्या आंब्याच्या सुरक्षिततेसाठी मालकने तैनात केले 3 गार्ड अन् 9 कुत्रे

Subscribe

2017 जपानमध्ये याची बोली तब्बल 3600 डॉलर इतकी लागली होती. जर भारतीय रुपयांमध्ये याचे रुपांतर केले असता अडीच लांखांच्या घरात पोहोचेल

मध्य प्रदेश राज्यातील जबलपुर येथे एका आब्यांच्या बागेच्या सुरक्षेकरिता मालकाने चक्क 3 गार्ड आणि 9 कुत्रे यांना तैनात केलं केल आहे. माहितीनुसार असे बोलण्यात येते आहे की ह्या आब्यांची किमंत तब्बल लाखोंच्या घरात आहे. ह्या जातीचा आंबा जपान देशात आढळून येतो. जबलपुर मध्ये असलेल्या या आंब्याची मुळ किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 2 लाख 70 हजार रुपये इतकी आहे. यामुळेच या खास आंब्याच्या सुरक्षिततेसाठी 24 तास रक्षकांची दरवळ पाहायला मिळतेय. बागेच्या मालक संकल्प यांनी सांगितले आहे की, जापानी आंब्याचे नाव ‘टाइयो नो टमँगो’ असे आहे. तसेच याला एग ऑफ सन म्हणजेच सूर्य चा अंडा असे देखिल बोलले जाते. तसेच गेल्या वेळेस या आब्याची अनेकांनी चोरी केली होती ज्यामुळे त्यांना याच्या सुरक्षिततेसाठी एवढां खटाटोप करावा लागत आहे.

- Advertisement -

हा आंबा पिकल्यानंतर हलकासा लाल पिवळा रंगात बदलतो तसेच याचे वजन जवळ-जवळ 900 ग्राम आहे. यात रेशा आढूळन येत नाहीत. तसेच हा अत्यंत रसाळ व गोड आहे. या आंब्याची प्रजातीचे जपान मध्ये संरक्षित वातावरणात लागवड करण्यात येते. पण संकल्प सिंगने याची लागवड खुल्या शेतात केली आहे. 2017 जपानमध्ये याची बोली तब्बल 3600 डॉलर इतकी लागली होती. जर भारतीय रुपयांमध्ये याचे रुपांतर केले असता अडीच लांखांच्या घरात पोहोचेल


हे हि वाचा – ‘बाबा का ढाबा’चे मालक कांती प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, परिस्थिती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -