घरक्राइमकोल्हापूरच्या व्यापार्‍याला नाशकात मिर्चीचा झटका

कोल्हापूरच्या व्यापार्‍याला नाशकात मिर्चीचा झटका

Subscribe

तीन भामट्यांकडून १५ लाखांना गंडा

कर्नाटक येथील एका आले व्यापार्‍याला चार लाखाला गंडवल्यानंतर त्याच पद्धतीने तीन भामट्यांनी कोल्हापूरच्या मिर्ची व्यापार्‍याला १५ लाख रूपयांना गंडवल्याचा प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. लाल मिर्ची दिल्यानंतर तत्काळ रोख रक्कम दिली जाईल, असे भासवून तीन भामट्यांनी पैसे नसलेल्या बँक खात्याचा चेक देत कोल्हापूरच्या व्यापार्‍याची १५ लाखांची लाल मिर्ची गायब केली. याप्रकरणी शेतमाल व्यापारी संदिप रावसाहेब पाटील (वय ३२, रा.शिरोळ, जि.कोल्हापूर) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित मोहसीन अकिल शेख व त्याच्या दोन साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी ते ५ मार्च २०२१ या कालावधीत संशयित आरोपींनी संगनमत करत संदिप पाटील यांच्याशी संपर्क साधला. शेतमालाचे व्यापारी असल्याचे संशयितांनी भासवून त्यांना १५ लाख रुपयांची लाल मिर्ची खरेदी करणार आहे. मिर्चीचे सर्व पैसे जागेवर देवू, असे संदिप पाटील यांना सांगितले. लाल मिर्चीला चांगला भाव मिळत असल्याने संदिप पाटील यांनी विश्वासाने टेम्पोतून लाल मिर्ची नाशिकला आणली. नाशिक शहरातील हॉटेल एक्प्रेस इन पाठीमागे, पाथर्डी फाटा येथे संशयितांनी पाटील यांच्या टेम्पोतील मिर्ची दुसर्‍या टेम्पोमध्ये परस्पर टाकून घेतली. मिर्चीचे पैसे लवकरच देतो, असे सांगून संशयितांनी पैसे न देता पैसे नसलेल्या बँक खात्याचा चेक दिला. त्यांनतर संशयित मोबाईल बंद करुन गायब झाले. संबंधित व्यक्ती कोणताही संपर्क करत नसल्याने आणि मिर्ची परत करत नसल्याचे फसवणूक झाल्याचे संदिप पाटील यांच्या लक्षात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -