घरदेश-विदेशमहिलेने दिला एकाच वेळी सहा चिमुकल्यांना जन्म

महिलेने दिला एकाच वेळी सहा चिमुकल्यांना जन्म

Subscribe

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका महिलेने एकाचवेळी चार मुल आणि दोन मुलींना जन्म दिला आहे.

आई होण ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची आणि आनंददायी अशी गोष्ट असते. साधारण एकावेळी जुळे किंवा तीळे होण्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. मात्र अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका महिलेने एकाच वेळी ६ बाळांना जन्म दिल्ल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. अमेरिकेच्या ‘द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास ‘ मध्ये थेलमा चेका नामक महिलेने या बाळांना जन्म दिला आहे. या नवजात बालकांमध्ये चार मुल आणि दोन मुलींचा समावेश आहे. द वुमेन्स हॉस्पीटल ऑफ टेक्सास या अमेरिकेतील हॉस्पीटलने आपल्या अधिकृत फेसबुक आकाउंट वरुन बाळाच्या आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

बाळांची नावही ठेवली

द वुमेन्स हॉस्पीटल ऑफ टेक्सासने शेअर केलेल्या फोटोमध्ये थेलमा म्हणजेच या नवजात सहा बालकांना जन्म देणारी आई आनंदी आसल्याचे दिसत आहे. दरम्यान, प्रसुती नंतर बाळ आणि आई दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अमेरिकने वेळेनुसार सकाळी ४.५० ते ४.५९ या वेळेत या महिलेने या बाळांना जन्म दिला आहे. थेलमाने जन्म दिलेल्या या नवजात बालकांमधील दोन मुलींची नाव देखील ठेवली आहे. एका मुलीचे नाव जीना तर दुसऱ्या मुलीचे नाव तिने ज्युरियल ठेवले आहे.

इराकमध्ये सात बाळांना जन्म

या आधी इराकमध्ये देखील अशाच प्रकारे एका महिलेने सात बाळांना जन्म दिला होता. यामध्ये त्या महिलेने एकाच वेळी सहा मुली आणि एका मुलाला जन्म दिला होता. मुख्य म्हणजे या महिलेची प्रसुती नैसर्गिक रित्या झाली होती. प्रसुती नंतर महिला आणि बाळ दोघांची प्रकृती देखील उत्तम होती हे विषेश.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -