घरCORONA UPDATECoronavirus New Variant: कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जग चिंतेत, फ्लाईट्स बंदीची तयारी?

Coronavirus New Variant: कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जग चिंतेत, फ्लाईट्स बंदीची तयारी?

Subscribe

दक्षिण अफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगातील सर्वच देश चिंता व्यक्त करत आहेत. अशातच अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती व्यक्त होतेय. परिणामी शेअर्स बाजारातही पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक आरोग्य संघटनेनेही शुक्रवारी आपत्कालीन बैठक घेत अफ्रिकन कोरोना व्हायरसविरोधात गंभीर इशारा दिला आहे. यावर ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले की, हा विषाणू डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाच्या तुलनेत अधिक चिंताजनक आहे, मात्र लसीकरणामुळे याचा प्रभाव कमी होतोय. ज्यामुळे लवकरात लवकर योग्य पाऊलं उचलणे गरजेचे आहे. दरम्यान युरोपियन देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंट बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर जर्मनीचे आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन यांनीही कोरोनाच्या नव्या व्हेरियंट समस्या निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे.

युरोपियन संघ आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सांगितले की, या विषाणूचे वाढत्या रुग्णसंख्येमुळे विमान उड्डाण स्थगित केले पाहिजे. तसेच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या देशांमधील प्रवाशांनाही कडक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले पाहिजे. युरोपीय महासंघातील बेल्जिअम हा देश विमान उड्डाणावर बंदी आणणारा पहिला देश ठरला आहे. तर इस्त्राइलचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, मलावीमधून आलेल्या एका प्रवाश्यामध्ये कोरोना नवी व्हेरियंट आढळून आला आहे.

- Advertisement -

दरम्यान ब्रिटन देशाने दक्षिण आफ्रिका आणि अन्य पाच आफ्रिकन देशांमधून दुपारी ब्रिटनसाठी होणारे विमान उड्डाण रोखण्याची घोषणा केली आहे. यात बोत्सवाना, लसोथो, इस्वातिनी, जिम्बब्वे आणि नामीबियामधून येणाऱ्या लोकांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. याशिवाय जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, बेल्जिअम, माल्टा आणि युरोपीन देशांनीही आत्ता आतंरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर अनेक निर्बंध लादले आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -