घरदेश-विदेशथेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट कराराचा दुसऱ्यांदा पराभव

थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट कराराचा दुसऱ्यांदा पराभव

Subscribe

इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना परत एकदा मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी झालेल्या ब्रेक्झिट कराराच्या मतदानामध्ये ३९१ विरूद्ध २४२ मतांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

युरोपिय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत ब्रेक्झिट कराराला संसदेच्या प्रतिनिधीगृहात मंगळवारी मतदान करण्यात आले. त्यामध्ये ३९१ विरूद्ध २४२ मतांनी इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या प्रस्तावला फेटाळून लावले आहे. ब्रेक्झिट प्रक्रियेला सुरुवात होण्यासाठी अवघे १७ दिवस बाकी आहेत. ब्रेक्झिटनुसार येणाऱ्या काही दिवसात ब्रिटन आणि युरोपियन महासंघ वेगवेगळे होणार आहेत. त्यापूर्वी दोघांमधील वाटाघाटींना ब्रिटनच्या संसदे कडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, पुन्हा एकदा थेरेसा मे यांच्या प्रस्तावाला नाकारले आहे. आता बुधवारी पुन्हा एकदा ब्रिटनने कोणतीही वाटाघाटी न करता युरोपीन महासंघातून बाहेर पडायचे का, यावर मतदान केले जाणार आहे. तसेच हा प्रस्तावही नाकारला तर ब्रेक्झिटसाठी आणखीण वेळ मागण्याच्या प्रस्तावावर मतदान घ्यावे लागणार आहे.

युरोपियन महासंघाचे अध्यक्ष निराश

ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ब्रिटनवर आर्थिक संकट येण्याची दाट शक्यता आहे. ब्रिटीश संसदेने हा प्रस्ताव नाकारल्यामुळे मी खूप निराश झालो आहे. आमच्याकडून वाटाघाटींसाठी सर्वतोपरी प्रयत्न झाल्याचे युरोपियन महासंघाचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या मतदानामध्ये ४३२ खासदारांने या विरोधात तर २०२ खासदारांनी त्या बाजूने मतदान केले होते. सन २०१६ मध्ये ब्रिटन नागरिकांनी ५२ टक्के विरुद्धा ४८ टक्के बहुमताने २८ देशांनी युरोपिय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने दिले होते. दोन वर्षांच्या वेळापत्रका प्रमाणे ब्रिटनला २९ मार्चला बाहेर पडावे लागणार आहेत. त्यापूर्वी या कराराला पार्लमेंटमध्ये मंजूरी होणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -