घरदेश-विदेश१ ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' नियम, तुमच्या खिश्यावर होणार थेट परिणाम

१ ऑक्टोबरपासून बदलणार ‘हे’ नियम, तुमच्या खिश्यावर होणार थेट परिणाम

Subscribe

नागरिकांना आर्थिक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपासून बँकांसंबंधित अनेक नियमांत बदल केले जात आहेत. यात पेन्शनचा नियम, चेकबुक, ऑटो डेबिट कार्ड, एलपीजीचे दर आदींचा समावेश आहे. याच थेट परिणाम तुमच्या खिश्यावर होणार आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

बँकेचे जुने चेकबुक होणार इनव्हॅलिड

१ ऑक्टोबरपासून तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड कालबाह्य होणार आहे. यात ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि अलाहाबाद बँक या बँकांचा समावेश आहे. या बँकांचे हल्लीच इतर बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे. यामुळे आता संबंधित बँक खातेधारकांचे खाते क्रमांक, आयएफएससी आणि एमआरसीआर कोडमध्ये बदल होणार आहेत. १ ऑक्टोबरपासून या संबंधित बँकांचे जुने चेक बुक बँकिंग सिस्टिम रिजेक्ट करले, त्यामुळे बँकांचे सर्व चेकबुक इनव्हॅलिड होतील.

- Advertisement -

पेन्शन संबंधित नियमांत बदल

१ ऑक्टोबरपासून डिजिटल लाईफ सर्टिफिकेटशी संबंधित नियम बदलणार आहे. त्यामुळे आता देशातील सर्व ज्येष्ठ पेन्शनर्स ज्यांचे वय ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा व्यक्ती देशातील कुठेल्याही हेड पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रमाण सेंटरमध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करु शकतात. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पोस्टाच्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचे काम करता येईल.

गुंतवणुकीसंबधी नियमांत बदल 

म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांच्या हितांचा विचार करून मार्केट रेग्युलेटर सेबीने १ ऑक्टोबरपासून नियमांत बदल केले आहेत. हे नियम अॅसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजेच म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या ज्युनियर कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. या नियमानुसार आता अॅसेट अंडर मॅनेजमेंट कंपनींच्या ज्युनियर कर्मचाऱ्यांना आपल्या ग्रॉस सॅलरीमधील १० टक्के भाग म्युच्युअल फंड युनिट्समध्ये गुंतवावा लागणार आहे. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत फेजवाईज हा पगाराच्या २० टक्के होईल. याला सेबीने स्कीन इन द गेम म्हटले आहे.

- Advertisement -

ऑटो डेबिट कार्डचे नियमांत बदल

१ ऑक्टोबरपासून क्रेडिट/डेबिट कार्ड (ATM)पासून होणाऱ्या ऑटो डेबिटसाठी आरबीआयने नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार, आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटमधून होणारे काही ऑटो डेबिट हे ग्राहकांच्या मान्यतेशिवाय होऊ शकणार नाही. १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू होणाऱ्या नव्या Additional Factor Authentication नियमानुसार, बँकेला कुठल्याही ऑटो डेबिट पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट २४ तासांआधी एक नोटिफिकेशन पाठवावे लागेल. या नोटिफिकेशनला ग्राहकाने कन्फर्म केल्यावरच त्याच्या खात्यामधून पैसे डेबिट केले जातील. याशिवाय एटीएम/डेबिट कार्ड वार्षिक देखभाल शुल्क १२५ रुपये अधिक जीएसटी लागू होईल. हे शुल्क १ ऑक्टोबर २०२१ आणि ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीसाठी लागू असतील.

एलपीजी सिलेंडरचे दर बदलणार

दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहे. दर महिन्याच्या १ तारखेला घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडरच्या नव्या किमती जाहीर होतात.

दिल्लीत खासगी दारुची दुकाने बंद

१ ऑक्टोबरपासून दिल्लीमध्ये खासगी मद्याची दुकाने बंद होतील. १६ नोव्हेंबरपर्यंत केवळ सरकारी दुकानांमधूनच मद्याची विक्री होईल. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितल्याप्रमाणे, नव्या अबकारी धोरणांतर्गत राजधानीला ३२ झोनमध्ये विभागून परवाना देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. आता १७ नोव्हेंबरपासून नव्या धोरणांतर्गत ही दुकाने उघडली जातील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -