घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हापरिषदेत ५८ कर्मचार्‍यांना पदोन्नत्या

जिल्हापरिषदेत ५८ कर्मचार्‍यांना पदोन्नत्या

Subscribe

सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारीपदी बढती

गेल्या आठवड्यात अनुकंपता तत्त्वावरील कर्मचार्‍यांची नियुक्ती झाल्यानंतर आता जिल्ह्यातील 58 कर्मचार्‍यांना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. यात 36 ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी बढती मिळाली.

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचार्‍यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंद पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर १६ तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहायक प्रशासन अधिकारी ६ तर ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी या पदावर ३६ कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आली.

- Advertisement -

यावेळी महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजाराने त्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण यांच्याबाबत पदोन्नती देताना सहानुभतीपूर्वक विचार करण्यात आला. या प्रक्रियेत सहायक प्रशासन अधिकारी, उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजीत पगारे, निवृत्ती बगड, नितीन पवार, स्विय सहाय्यक गौतम अग्निहोत्री, साईनाथ ठाकरे, सोनाली साठे, हर्षदा खैरनार, भास्कर कुवर, मंगेश केदारे प्रमोद ढोले, स्टीवन शहाबंद्री, अशोक अहिरे, ज्ञानेश्वर गायकवाड, कानिफनाथ फडोळ, स्वप्निल कानडे, वसंत काळे, प्रमोद जाधव, अशोक खेडुलकर, सुनिल थैल यांनी परिश्रम घेतले.

यांना मिळाली पदोन्नती 

सहायक प्रशासन अधिकारी : वृषाली दिलीप पाठक, ललिता ज्ञानेश्वर जाधव,राजेंद्र गणपत भुजबळ, प्रमोद रंगनाथ नवले, संजय किसनराव सोनवणे, नरेंद्र दंगल कचवे.

- Advertisement -

कनिष्ठ प्रशासन अधिकारी : अनिल एकनाथ दराडे,आनंदा देविदास रासने, नितीन किशोर मालुसरे, रविंद्र भैय्यासाहेब शेवाळे, निलेश भगवान पाटील, दिलीप रामचंद्र धोंगडे,गणेश विठ्ठल भुजबळ,दिलीप रामचंद्र बिरारी, उदय एकनाथ लोखंडे, सुदाम पांडुरंग राऊत, किशोर नारायण औटे, वामन गंगा भोये, ज्ञानेश्वर सोनु कापसे, अश्विनी संतोष थैल, संदिप रामदास कापसे, सचिन कल्याणराव विंचुरकर यांचा समावेश आहे. यात ग्रामसेवक या संवर्गातून ग्रामविकास अधिकारी या पदावर 36 कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -