घरदेश-विदेश'मेड इन चायना' लस घेणाऱ्यांनाच चीनमध्ये एन्ट्री

‘मेड इन चायना’ लस घेणाऱ्यांनाच चीनमध्ये एन्ट्री

Subscribe

भारतासह अन्य १९ देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी चीन दूतवासाने काढली नोटीस

जगभरात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. अनेक देशांनी विदेशी प्रवाशांसाठीही कोरोना लसीकरण नियम ठरवून दिले आहेत. परंतु चीन देशाने भारतासह अन्य १९ देशांतून येणाऱ्या नागरिकांना मेड इन चायना लस घेतल्यावर देशात एन्ट्री देणार असल्याचा फतवा काढला आहे. त्यामुळे चीनमध्ये जाणाऱ्या भारतीयांसह अन्य १९ देशातील नागरिकांना चीननिर्मित कोरोना लस घेणे अनिवार्य असणार आहे. भारतात सध्यातरी चीन निर्मित कोणत्याही लसीला मान्य देण्यात आलेली नाही. त्यामुळे चीनच्या या निर्णयामुळे चीनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. कोरोना विषाणू जगभरात पसवणाऱ्या चीनने विदेशी नागरिकांवर बंद घातली आहे. कोरोना रोखण्यासाठी चीन सरकारने परदेशी नागरिकांना देशात येणास बंदी घातली होती. यात चीन आता ठरावीक विदेशी नागरिकांसाठी व्हिसा देण्याचा निर्णय घेत आहे. यासंदर्भात नवी दिल्लीच्या चीन दूतवासाने एक निवेदन जाहीर केली आहे.

या नोटीसमध्ये चीन दूतवासाने लिहिले की, एका देशातून दुसऱ्या देशातील प्रवास सुरु करण्याच्या उद्देशाने १५ मार्च २०२१ पासून भारतात चीन दूतवास आणि वाणिज्य दूतवास चीनमध्ये येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना चीननिर्मित कोरोना लस देणार आहे. तसेच चीनी कोरोना लसीकरण दिलेचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. ही नोटीस भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, नायजेरिया, ग्रीस, इटली, इस्त्राईल, नॉर्वे आणि इंडोनेशियासह २० देशांतील चिनी दूतावासांनी जाहीर केली आहे. अशी माहिती चीनची सरकारी वृत्तवाहिनी ग्लोबल टाईम्सने दिली आहे. याव्यतिरिक्त, दूतावासाच्या निवेदनात असे नमूद केले आहे की, हा नियम कोरोना वॅक्सीनचे दोन डोस घेतलेल्या तसेच व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर कमीत कमी १४ दिवसांपूर्वी लस घेतलेल्यांना हा नियम लागू केला आहे. परदेशातून चीनमध्ये प्रवास करताना नागरिकांना स्वत:चे इलेक्ट्रॉनिक हेल्थ डिक्लेरेशनही जमा करावे लागणार आहे. तसेच चीनमध्ये पोहचल्यावर तेथील स्थानिक प्रशासनाच्या गाईडलाइन्सनुसार स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घ्यावे लागणार आहे, असेही या निवेदनात स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -