घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलच्या दरात घट

पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

Subscribe

पेट्रोल - डिझेलच्या दरात किंचित कपात. जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा बऱ्याच दिवसांपासून भडका सुरुच होता. मात्र गुरुवारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २४ पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ११ पैशांनी कपात जाहीर केली आहे. इंधन उत्पादनावरील खर्चात घट झाल्याने ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांकरता एक आनंदाची बातमी मिळाली असून आज पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरात किंचित का होईना पण कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

सातत्याने वाढणारे पेट्रोल – डिझेलचे दर कमी झाले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर २४ पैशांनी स्वस्त झाला आहे तर डिझेलच्या दरामध्ये ११ पैशांनी कपात झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोल आज ८७.८४ रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ७९.१३ रुपये प्रतिलिटर दराने झाले आहे. सतत वाढणाऱ्या पेट्रोल – डिझेलच्या दराने त्रस्त झालेल्या जनतेच्या चेहऱ्यावर थोडासा का होईना आनंद पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दिल्लीतील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर २४ पैशांनी स्वस्त झाला आहे तर डिझेलच्या दरामध्ये १० पैशांनी कपात झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल आज ८२.८३ रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ७५.४८ रुपये प्रतिलिटर दराने झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्यादिवशी ही पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचिंत कपात झालेली पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या आधी झालेली कपात

इंधनाच्या दरात सतत होत असलेली वाढ असल्याने त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चार ऑक्टोबरला या दोन्ही इंधनाच्या किंमतीत अडीच रुपयांची कपात केली होती. यात दीड रुपयांची उत्पादन शुल्ककपात आणि सरकारी तेल कंपन्यांकडून एक रुपयाचे अनुदान याचा समावेश होता. यामुळे इंधनाचे दर आटोक्यात येतील असे वाटत होते. मात्र दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत गेल्य़ाने ही शुल्ककपात कुचकामी ठरली होती. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरात किंचित अशी कपात झाली आहे.

वाचा – दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल – डिझेल स्वस्त

वाचा – पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार?

वाचा – जेल परिसरात पेट्रोल पंप उभारून कैद्याना रोजगार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -