घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार?

पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार?

Subscribe

सतत वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलची दर वाढ कधी थांबणार असा प्रश्न जनतेला सतावत आहे. सातत्याने होत असलेल्या दर वाढीमुळे जनता त्रस्त झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचा भडका सुरुच आहे. मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. अवघ्या एकदिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात ११ पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरामध्ये २३ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.८३ रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ७५.६९ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. दिल्लीसोबतच मुंबईमध्ये देखील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरामध्ये ०.११ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये ०.२४ पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८८.२९ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे तर डिझेलमध्ये ०.२४ पैशांनी वाढ झाल्यामुळे मुंबईत डिझेल ७९.३५ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.

मोदींनी केली दरवाढीबाबत चर्चा

सातत्याने वाढ होत असलेल्या दरवाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या दरम्यान मोदींनी कंपनींच्या प्रतिनिधींशी दरवाढीबाबत चर्चा देखील केली होती. मात्र तरी देखील मंगळवारी पुन्हा एकदा इंधनदरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

वाचा – जेल परिसरात पेट्रोल पंप उभारून कैद्याना रोजगार

- Advertisement -

वाचा – पेट्रोल-डिझेलनंतर विमाही महागला

वाचा – पेट्रोल झालं स्वस्त; पण तुमच्यासाठी नाही!

वाचा – पेट्रोल-डिझेलचा भडका सुरुच

वाचा – पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र चौथ्या दिवशी सुरुच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -