Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Trash on the moon : सवय ती सवयच... माणसांनी चंद्रालाही नाही सोडले;...

Trash on the moon : सवय ती सवयच… माणसांनी चंद्रालाही नाही सोडले; तेथे जाऊनही टाकला कचरा

Subscribe

मानवाने आतापर्यंत केलेल्या चंद्रमोहिमाद्वारे पृथ्वीवरील कचरा चंद्रावर नेऊ टाकला आहे. या कचऱ्यामध्ये घन कचरा, मशीन, उपग्रहांचे अवशेष, मानवाचे मल-मूत्र, भाला, चिमटे, टॉवेल, ब्रश या गोष्टींचाही समावेश आहे.

बंगळुरू : पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांनी नेहमीच आंतरराळाचे आकर्षण राहले आहे. त्यामुळेच या अवकाशात नेमके आहे तरी काय हेच शोधण्याचा प्रयत्न मागील अनेक वर्षापासून भारतासह जगभरातील वैज्ञानिक करीत आहेत. मात्र, हे शोधण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये कधी ते यशस्वी होतात तर कधी अपयश पदरी पडते. मात्र, असे करत असताना याच वैज्ञानिकांकडून केला जातोय तो कचरा. तोही कुठे तर चक्क चंद्रावर. चांद्रयान-3 मोहिमेच्या निमित्ताने पाहले तर चंद्रावर तब्बल 200 टन कचरा असून, तो खाली कसा आणावा असा प्रश्न वैज्ञानिकांना पडला आहे.(Trash on the moon : Habit is habit… Humans have not left even the moon; Throwing garbage there)

मानवाने आतापर्यंत केलेल्या चंद्रमोहिमाद्वारे पृथ्वीवरील कचरा चंद्रावर नेऊ टाकला आहे. या कचऱ्यामध्ये घन कचरा, मशीन, उपग्रहांचे अवशेष, मानवाचे मल-मूत्र, भाला, चिमटे, टॉवेल, ब्रश या गोष्टींचाही समावेश आहे. वर्षानुवर्षे या वस्तू तिथे जशाच्या तशा राहत आहेत. या वस्तू नष्ट होत नसल्याने चंद्रावरही कचऱ्यांचे ढीग उभे राहत असल्याने ही नवी समस्या आता जगासमोर उभी राहू पाहत आहे.

या देशाचे साहित्य चंद्रावर सर्वाधिक

- Advertisement -

चंद्रावर म्हणजे अवकाशात झेप घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, भारत, चीन या देशांचा समावेश आहे. या देशांच्या मोहिमांमधूनच हा कचरा चंद्रावर पडलेला आहे. यामध्ये नासाच्या अपोलो 11 मिशनद्वारे मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं. हे अपोलो यान चंद्रावर जिथे लँड झाले, त्याच्या बाजूला काही वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. तर रशियाच्या लुना 9 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे पहिले अंतराळयान आहे. त्याचे अवशेष चंद्राच्या पश्चिम ध्रुवावर आहे. क्रॅश झालेल्या आणि तुटलेल्या अंतराळ यानाव्यतिरिक्त, अनेक वैयक्तिक सामान देखील चंद्रावर आहे.

हेही वाचा : ईडी संचालक संजय मिश्रांसाठी केंद्र सरकारकडून नवीन पदाची निर्मिती; ED-CBI करणार रिपोर्टिंग

धार्मिक पुस्तकांसह गोल्फ बॉल आणि पारिवारिक फोटोही

- Advertisement -

अंतराळवीरांनी चंद्रमोहिमेदरम्यान सोडलेल्या वस्तू तेथील कचऱ्यात आहेत. यामध्ये काहींनी यामध्ये मानवी मलमूत्र, केलेल्या उलट्यांच्या पिशव्या, दोन गोल्फ बॉल, धातूचा रॉड, बायबल पुस्तक यासोबतच कुटुंबासोबतचा एक फोटोही चंद्रावर आहे.

हेही वाचा : आली रे आली आता चंद्र तुझी…चांद्रयान-3 नंतर भारत चांद्रयान-4 च्या तयारीला; जपान करणार सहकार्य

यांनी ठेवले आतापर्यंत चंद्रावर पाऊल

चंद्रावर आतापर्यंत 12 व्यक्तींना पाऊल ठेवले आहे नील आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन, पीट कॉनरॅड, ॲलन बीन, डेव्हिड,
ॲलन शेपर्ड, एडगर मिशेल, जेम्स इर्विन, जॉन यंग, चार्ल्स ड्यूक, यूजीन सर्नन, हॅरिसन स्मिथ या 12 वैज्ञिकांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे.

- Advertisment -