घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिडकोत खून; ६ तरुणांनी केले १२ सेकंदात २७ वार

सिडकोत खून; ६ तरुणांनी केले १२ सेकंदात २७ वार

Subscribe

नाशिक : अंबडमध्ये आठ दिवसांपूर्वी मयूर दातीर खूनाची घटना ताजी असताना पुन्हा गुरुवारी (दि.२४) भाजीविक्रेत्यावर सहा तरुणांनी अवघ्या १२ सेकंदात धारदार शस्त्राने २7 सपासप वार केल्याचे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले. त्यात भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला. भरदिवसा अंबडमधील शिवाजी चौकात व अवघ्या २० फूटावर असलेल्या शिवाजी चौक पोलीस चौकीजवळ खूनाचा थरार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तिसर्‍या गुरुवारी अंबडमध्ये तीन खूनाच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संदीप प्रकाश आठवले, (वय २३ रा. पेलिकन पार्क जवळ, नवीन नाशिक ) असे मृत भाजीविक्रेत्याचे नाव आहे.
पोलिसांनी व नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता संदीप चुलतभाऊ सनी राजू आठवले सोबत छत्रपती शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथे पाणीपुरी खाण्यासाठी आला होता. यावेळी दोन दुचाकीवरून सहा जण संदीपजवळ आले. काही समजण्याच्या आतच टोळक्याने संदीपवर धारदार शस्त्राने २५ हून अधिक सपासप वार केले. त्याला जखमी अवस्थेत मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ समवेत अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयत संदीपच्या पश्चात आई, वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे. पोलिसांना हल्लेखोरांची नावे समजली असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

हेही वाचा : शहरातील गुन्हेगारीला ‘अंकुश’ कधी लागणार?; नागरिक भीतीच्या छायेत

- Advertisement -

असा आहे खूनाचा घटनाक्रम

  • सायंकाळी ४.४५ : मृत संदीप आठवले मित्रासोबत पाणीपुरी खाण्यासाठी अंबडमधील शिवाजी चौकात आला होता.
  • सायंकाळी ४.५५ : शिवाजी चौकात उभा असताना संदीपवर टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार केले.
  • सायंकाळी ५.१० : जखमी अवस्थेत संदीपला मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
  • सायंकाळी ५.१५ : वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत संदीपला मृत घोषित केले. त्यानंतर नातलगांसह अंबडमधील नागरिकांची सिव्हिलमध्ये गर्दी.
  • सायंकाळी ५.२० : अंबडमध्ये खून झाल्याचे समजताच अंबड व सरकारवाडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस जिल्हा रुग्णालयात दाखल.
  • सायंकाळी ५.३० : पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पंचनामा केला. शिवाजी चौकात दंगल नियंत्रण पथकासह बंदोबस्त तैनात करण्यात आला.

हेही वाचा : शहरात कुठेही गुन्हेगारी, अवैध कृत्य घडतंय?, व्हॉटस अॅप उघडा अन् 8263998062 या नंबरवर पोलिसांना कळवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -