घरदेश-विदेशमेक्सिकोत २८ पोलिसांनी मिळून महापौराची केली हत्या

मेक्सिकोत २८ पोलिसांनी मिळून महापौराची केली हत्या

Subscribe

मेक्सिकोमध्ये आचारसंहितेच्या काळात एका महापौराच्या हत्येप्रकरणी २८ पोलिस शिपायांना अटक करण्यात आले आहे. सध्या मेक्सिकोच्या २०१८ निलडणुकांना रक्तरंजित स्वरुप प्राप्त झाले आहे.

महापालिकेतील २८ पोलिस शिपायांनी मिळून महापौरांची हत्या करण्याची घृणास्पद घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. देशातील सामाजिक आणि राजकीय घटनांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम तेथील समाज जीवनावर होत असतो. एखद्या देशामध्ये लोकशाहीचा भावार्थ कितपत रुजलेला आहे, याचे प्रतिबिंब त्या देशाच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर पडते. सध्या मेक्सिकोमध्ये २०१८ च्या निवडणुक प्रचारांना रक्तरंजित असे स्वरुप आलेले दिसत आहे. या प्रचारादरम्यान दरोडेखोर आणि गुन्हेगारांकडुन निवडणूकीच्या उमेदवारांची हत्या केली जाताना दिसत आहे. या विद्रोही वातावरणामुळे संपूर्ण मेक्सिको शहर हादरले आहे.

मेक्सिकोच्या मायचॉकन राज्यातील ओकॅम्पो महापालिकेच्या महापौरांची हत्या करण्यात आली आहे. फर्नांडो अँजेलोस जुआरेज असे या महापौरांचे नाव होते. ते डाव्या विचारसरणीशी समरस होते. ते एका डाव्या पक्षाचेच प्रतिनिधी होते. गुरुवारी, त्यांच्यावर गोळी जाडुन त्यांची हत्या करण्यात आली. रविवारी, राज्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक निवेदन जाहीर केले. या निवेदनात जुआरेज यांच्या हत्ये प्रकरणी महापालिकेच्या २८ पोलिस शिपायांना अटक करण्यात आले आहे. तेथील स्थानिक आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून देखील या हत्येमागे २८ पोलीस शिपायांचा हस्तक्षेप असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

१ जुलैला असणार राष्ट्रध्यक्ष पदाची निवडणूक

मेक्सिकोमध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आले आहे. १ जुलैला मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराला रक्तरंजित असे स्वरुप आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -