घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनाला रोखण्यासाठी जगाने 'या' देशाचं मॉडेल वापरावं; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांची सूचना

कोरोनाला रोखण्यासाठी जगाने ‘या’ देशाचं मॉडेल वापरावं; संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांची सूचना

Subscribe

फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र, काही आठवड्यात याचं प्रमाण कमी झालं.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप लस सापडलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. तरी देखील कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागीक वाढत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने कोरोना रोखण्यासाठी एक सूचना केली आहे. जगातील देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी दक्षीण कोरियाने केलेल्या उपाय योजनांचा अवलंब करावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी केली आहे. ते म्हणाले, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात दक्षिण कोरियाला मोठं यश आलं आहे. यासह आता ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी योजना आखत आहेत.

दक्षिण कोरियाने नुकतीच एक महत्वकांक्षी ‘हरित योजना’ सादर केली आहे. यामध्ये कोळशावर चालणाऱ्या नव्या यंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. यंत्रांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्याचे उपाय आहेत. दक्षिण कोरियाप्रमाणे, इतर देशांनी कोरोनाविरुद्ध लढण्या बरोबरच हवामान बदलामुळे होणारे नुकसानही कमी करण्यावर भर द्यावा. आपल्या अर्थव्यवस्थेला गती देताना, पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही, असे रोजगार निर्माण करण्यावर सर्व देशांनी विचार करायला हवा.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनचं उल्लंघन, सामूहिक नमाज अदा करण्याऱ्या १५ जणांना अटक


दक्षिण कोरियातील कोरोनाबाधीतांचा आकडा १० हजारावर

दक्षिण कोरियामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा १० हजार ७७४ वर पोहोचला आहे. तर २४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९ हजार ०७२ जण बरे झाले आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र, काही आठवड्यात याचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आता दक्षिण कोरियामध्ये नागरिकांना लॉकडाऊनमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -