घरदेश-विदेशवेब सीरिजच्या नावाखाली फसवणूक; मॉडेलची बोल्ड फिल्म पॉर्न साइटवर!

वेब सीरिजच्या नावाखाली फसवणूक; मॉडेलची बोल्ड फिल्म पॉर्न साइटवर!

Subscribe

या प्रकाराबद्दल तरूणीने कास्टिंग डायरेक्टरसह ५ जणांविरूद्ध तक्रार दाखल

मध्य प्रदेशात वेब सीरिज लाँचच्या नावाखाली तरूणीचा अश्लिल चित्रपट चित्रित करून तो अश्लील साइटवर अपलोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अश्लील फिल्म बनविण्याचे एक रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात हात असलेल्या कास्टिंग डायरेक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.

असा घडला प्रकार

आजतकच्या वृत्तानुसार, धामनोद येथील रहिवासी असलेल्या तरूणीने सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर २०१९ मध्ये ब्रिजेंद्र नावाच्या व्यक्तीने तिला वेब सिरीज सुरू करण्यास प्रवृत्त केले आणि तिला त्याच्या फार्म हाऊसमध्ये नेले. ही तरूणी इंदूरमध्ये मॉडेलिंग करते.

- Advertisement -

ही तरूणी तिचा कास्टिंग डायरेक्टर मित्र मिलिंदसोबत तेथे पोहोचली. बोल्ड चित्रपटात किंवा मालिकेत तिला काम मिळावे या बहाण्याने ब्रिजेंद्रने काही तिचे काही बोल्ड सीन शूट केले. त्यातील अश्लील कंटेन्ट काढून काही सीन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करत असल्याचे तिला सांगण्यात आले. यानंतर ही तरूणी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पहात राहिली. हा चित्रपट प्रदर्शित झाला पण अश्लील वेबसाइटवर… तेही सर्व अश्लील आणि बोल्ड सीनसह. या सर्व प्रकरणानंतर तिला धक्का बसला.

तरूणीच्या ओळखीनच्या लोकांनी तिला याबद्दल सांगितले, पण तोपर्यंत ४ लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला होता. घाबरून तिने ब्रिजेंद्र व तिच्या मित्राकडे संपर्क साधला पण त्यांनीही त्या तरूणीकडे दुर्लक्ष केले. या प्रकाराबद्दल तरूणीने कास्टिंग डायरेक्टरसह ५ जणांविरूद्ध तक्रार दाखल केली. मिलिंदची चौकशी सध्या सुरू आहे, तर ब्रिजेंद्र फरार असल्याचे सांगितले जात आहे.


गॅस गिझरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट; महिलेचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -