घरदेश-विदेशUPSC JOB 2023 : वैद्यकीय सेवांसाठी 1261 पदांवर भरती सुरू, असा करा अर्ज

UPSC JOB 2023 : वैद्यकीय सेवांसाठी 1261 पदांवर भरती सुरू, असा करा अर्ज

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा (UPSC CMS 2023) भरती परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली असून नोंदणीची प्रक्रियाही आजपासून सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध सरकारी मंत्रालयांमध्ये वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी युपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 16 जुलै 2023 रोजी होणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2023 पर्यंत आहे. युपीएससीच्या वतीन सांगण्यात आले आहे की, परीक्षेच्या तीन आठवड्यांपूर्वी ई-प्रवेशपत्र वितरित केले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना यावेळी पोस्टल मेलद्वारे प्रवेशपत्र मिळणार नाही आहे. युपीएससी संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेसाठी नोंदणी करताना उमेदवारांना अर्ज फी म्हणून 200 रुपये भरावे लागतील. तसेच महिला, SC, ST आणि PWBD उमेदवारांना अर्ज फी न भरताच परीक्षा देता येणार आहे.

- Advertisement -

संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षेचा नमुना
यूपीएससीच्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा दोन भागानुसार होणार आहे. पहिल्या भागात पाचशे गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. यावेळी उमेदवारांना दोन पेपरमध्ये लेखी परीक्षा द्यावी लागेल. प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त 250 गुण असणे गरजेचे आहे आणि दोन्ही पेपरचा कालावधी दोन तासांचा असेल. दुसरा भागात 100 गुणांसाठी व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा होणार आहे. जे लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांनाच व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरवले जाईल. यावेळी वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी उमेदवारांना निगेटिव्ह मार्किंग मिळेल.

परीक्षेचा अर्ज कसा करावा
1. सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
2. होम पेजवर UPSC CMS परीक्षा 2023 लिंकवर क्लिक करा.
3. एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवार अर्ज करण्यासाठी थेट लिंक तपासू शकतात.
4. आता स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा.
5. अर्जाची फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
6. फॉर्म PDF म्हणून डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -