घरठाणेमोठी बातमी ! नवी मुंबई, पनवेल आणि ठाण्यातील अनेक भागांत बत्ती गुल!

मोठी बातमी ! नवी मुंबई, पनवेल आणि ठाण्यातील अनेक भागांत बत्ती गुल!

Subscribe

ठाण्यातल्या खोपट, नौपाडा, कोपरी, बाळकुम आणि अन्य काही भागात तर नवी मुंबईतील बेलापूर, वाशी, जुईनगर परिसरात वीरपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पनवेलमधील देखील काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

नवी मुंबई, पनवेल आणि ठाण्यातील अनेक भागांत विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या दीड तासांपासून अनेक भागात बत्ती गुल झाली आहे. एकीकडे घराबाहेर असलेला असह्य उकाडा आणि दुसरीकडे घरात बत्ती गुल झाल्यामुळे एसी आणि फॅनही बंद झाल्यामुळे नागरिक खूपच हैराण झाले आहेत. तसंच घरात वीजेवर अवलंबून असलेली कामे देखील खोळंबली असल्याने लोक वैतागले आहेत.

मावळ तालुक्यातील केवळे गावाजवळ एका डोंगराळ परिसरातील जंगलात आग लागली होती. यामुळे तळेगाव ते खारघर लाईनमध्ये दुपारी १.५५ वाजता काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे हा वीज पुरवठा खंडित झालाय. यामुळे तळेगाव पासून ते थेट पनवेलपर्यंत अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय. ठाण्यातल्या खोपट, नौपाडा, कोपरी, बाळकुम आणि अन्य काही भागात तर नवी मुंबईतील बेलापूर, वाशी, जुईनगर परिसरात वीरपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पनवेलमधील देखील काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई आणि ठाण्यासाठी आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतील तापमान अधिक राहण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. ठाणे, नवी मुंबई परिसरातील तापमान ४० अंशांपार गेल्यानं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून अलर्ट देखील देण्यात आलाय. अशात गेल्या दीड तासापासून या परिसरात वीजच नसल्यानं लोकांची अंगाची लाहीलाही होत आहे.

मावळ तालुक्यातील केवळे गावाजवळ डोंगराळ भागात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. साधारण पाऊण तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. त्यानंतर या लाईनवर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यामध्ये साधारण ३४७ मेगावॅटचे भारनियम करावे लागले. वीज पुरवठा हळुहळू वेगवेगळ्या भागात सुरळीत होण्यात सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

असं विद्यूत पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. घामाघूम झालेले नागरिक भरदुपारी रस्त्यावर उतरले आहेत.अनेकांच्या घरातील इन्व्हर्टरची बॅटरीही संपली. तर, सोसायट्यांमधील जनटेरर्सही बंद पडले होते. त्यामुळे रहिवाशांचे हाल झाले..

महावितरण कंपनी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. त्यानंतरही विजेच्या वाढत्या मागणीचा भार या यंत्रणेला का पेलवत नाही, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -