घरमुंबईसुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी; निवृत्त IPS अधिकाऱ्यांची न्यायालयात धाव

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी; निवृत्त IPS अधिकाऱ्यांची न्यायालयात धाव

Subscribe

'' काही ठराविक वृत्तवाहिन्यांकडून मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार करून या पोलिस दलाची बदनामी होतेय ''

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला गेले कित्येक दिवस उलटून गेले असले तरी त्याच्या आत्महत्येचा अद्याप शोध सुरू आहे. मात्र सुशांत सिंह प्रकरणात काही ठराविक वृत्तवाहिन्यांकडून मुंबई पोलिसांविरोधात अपप्रचार करून या पोलिस दलाची बदनामी केली जात आहे, असा दावा महाराष्ट्र पोलिस दलातील आठ निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी केला असून या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

असे म्हटले याचिकेत…

या अधिकाऱ्यांनी न्यायालयातील आपल्या याचिकेत असे म्हटले आहे की, ‘काही प्रसारमाध्यमांकडून खोट्या, चुकीच्या, निराधार व मुंबई पोलिस दलाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने त्याला प्रतिबंध करावा’. या याचिकादारांमध्ये राज्याचे माजी पोलिस महासंचालक एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. शिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथुर व के. सुब्रमण्यम तसेच माजी मुंबई पोलिस आयुक्त डी. एन. जाधव व माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांचा समावेश आहे.

- Advertisement -

‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे याचिका उच्च न्यायालयासमोर

‘तपास सुरू असलेल्या प्रकरणाचे वार्तांकन संतुलित व वस्तुस्थितीदर्शक असायला हवे. कोणत्याही एका बाजूला न झुकता सचोटीने वार्तांकन होणे अभिप्रेत आहे. मात्र, काही ठराविक वृत्तवाहिन्यांकडून तसे होताना दिसत नाही. चुकीचे व हेतूपूर्वक वार्तांकन करून मुंबई पोलिस दलाला लक्ष्य करून या दलाची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न होताना दिसत आहे. शिवाय सुशांतसिंहच्या प्रकरणात तपास यंत्रणांकडून तपास सुरू असताना एकप्रकारे मीडिया ट्रायलही होताना दिसत आहे. याला चाप लावणारे निर्देश द्यावेत. तसेच वार्तांकनाच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना घालून द्याव्यात’, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

ही याचिका लवकरच उच्च न्यायालयासमोर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणीस येण्याची शक्यता आहे.


‘मुंबई पोलिसांची भीती वाटते’; म्हणणाऱ्या कंगनाला संजय राऊतांनी सुनावले खडेबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -