घरदेश-विदेशधक्कादायक: ११ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या

धक्कादायक: ११ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या

Subscribe

नुकतीच अलीगडमधील तीन वर्षाच्या लहानग्या मुलीच्या निर्घृण हत्येचे प्रकरण ताजं असतांना पुन्हा उत्तर प्रदेशच्याच हमीरपूर येथे ११ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशात असणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणावर आला आहे. या घटनेत बलात्कार करणारा आरोपी बेपत्ता असून पोलिसांकडून त्याचा शोध घेणं सुरू असून या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीची मागणी देखील करण्यात येत आहे.

अत्याचारानंतर गळा दाबून घेतला जीव 

हमीरपूर येथे कुरारा परिसरामध्ये हा प्रकार घडला. तेथील एका परिवारातील माणसं मागील दोन महिन्यांपासून मजूरीच्या कामानिमित्त कानपूर येथे राहत असल्याने ही ११ वर्षीय मुलगी घरात एकटी आहे हे पाहून शुक्रवारच्या रात्री काहीं लोक घरात घुसून मुलीला उचलून बाहेर घेऊन गेले. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून जीव घेतला आणि तिचा मृतदेह गावाच्या स्मशानभुमीत फेकला.

- Advertisement -

स्मशानभूमीत मिळाला मृतदेह 

सकाळच्या वेळी गावातील काही माणसांना स्मशानभूमीत तिचा मृतदेह मिळाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही लोकांनी या मुलीची ओळख पटवून तिच्या कुटुबींयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर कुरारा परिसरामध्ये संतापाचे वातावरण होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -